Aashadhi Wari 2024: बॅनरवर खर्च पण पायाखाली वावर शीने भरलेले, बायकांना तर... वारीतील अस्वच्छतेवर अभिनेत्रीची परखड पोस्ट

Aashadhi Wari 2024 Problems: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने आषाढी वारीबद्दल थेट भाष्य केलं आहे.
ashadhi wari
ashadhi wari sakal
Updated on

Mugdha Godbole: दरवर्षी आषाढी वारी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. वारकरी मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला जातात. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता, सगळ्या अडचणींना तोंड देत ते विठुरायापर्यंत पोहोचतात. मात्र दरवर्षी त्यांना अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो ज्यात कधीच बदल होत नाही. मलमूत्र विसर्जनाच्या सोयीसुविधांचा अभाव, पाण्याची कमतरता, कचरा कुंड्याचा अभाव, सगळीकडे पसरलेलं घाणीचं साम्राज्य, या सगळ्या अडचणी दरवर्षी येतात मात्र त्यावर उपाययोजना करण्यात येत नाही. आता मराठमोळ्या अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी एक पोस्ट शेअर करत यासगळ्यावर परखड भाष्य केलं आहे.

मुग्धा यांनी चैताली माजगावकर यांची पोस्ट शेअर करत लिहिलं, 'जोपर्यंत बायकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण होत नाहीत, तोपर्यंत विकासाच्या कोणत्याही चर्चेला माझ्या लेखी शून्य किंमत आहे. चैताली माजगावकर-भंडारी हा अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद.'

काय आहे चैताली यांची पोस्ट?

चैताली यांनी लिहिले की, 'नमस्कार आजची पोस्ट मी आळंदी पुणे वारी केली ही बढाई मारण्यासाठी नसून काही अनुभव शेअर करण्यासाठी आहे. जवळपास २८ किलोमीटरचा टप्पा, त्यात लेडीज टॉयलेट हा नेहमीचा विषय, खरंतर पुरुषांना पण सोय नाही, पण उघड्यावर कुठेही ते बसत होते (ऑप्शन न्हवता). वारीत बिस्कट, पाणी, नाश्ता देणारे, दाढी पासून मसाज देणारे, अगदी आरोग्य तपासणी करणारे कितीतरी स्पॉन्सर होते. खरंतर आरोग्य धोक्यात संसर्गामुळे येते. लाखो वारकरी होते, पण त्यांच्या बेसिक मलमुत्र विसर्जनाची बेसिक सोय कुठेही नव्हती.'

'फिरते टॉयलेट होते, पण पाणी टाकायची सोयच नाही. वावर शीने भरलेले, बायकांना उघड्यावर बसायलासुद्धा जागा नाही. अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही, इतकी घाण आणि वासमारी होती, शिसारी येत होती. २८ किलोमीटरच्या टप्प्यात किमान १००० बिनकामाचे वारकऱ्यांचे स्वागत करणारे फ्लेक्स होते, ज्यांचा काही उपयोग नाही. डीजे आणि मांडव यावर खर्च, पण खरी गरज स्वच्छतेची आहे हे का समजत नाही? हे चित्र कधी बदलणार? किमान कचराकुंड्या आणि वारकऱ्यांना प्रशिक्षण द्या स्वच्छतेचे... कारण स्थानिक रहिवाशांना काय त्रास होतो ते मी पाहिले.

'बिल्डिंग खाली उतरले की फक्त शी, व्यक्त होण्यापलीकडे आपण काय करू शकतो, सुचवा? ठरवलं तर सगळ सहज शक्य आहे. दान करणारे कमी नाही. अख्ख्या जगात आपल्या वारीची चर्चा असते. ते स्पिरीट अनुभवण्यासाठी तर गेलो, पण किती ती घाण आणि कचरा याला काही अंत नाही. चालताना तहान लागत होती पण बाथरूमला कुठे जायचं या भीतीने काही मैत्रिणी पुरेस पाणी पीत नव्हत्या. किती अवघड परिस्थिती आहे ही. पुढाऱ्यांचे फ्लेक्स तर मस्तकात जात होते, फक्त शो ऑफ. पुण्य कमविण्यासाठी खरी गरज आहे स्वछतेची जेणेकरून पुढील वर्षी वारीला जायची पुन्हा इच्छा झाली पाहिजे आणि जगभरात आपल्या वारीची चांगली चर्चा झाली पाहिजे', असेही त्यांनी म्हटले.

अनेक नेटकऱ्यांनी मुग्धा यांच्या पोस्टला पाठिंबा दर्शवला आहे. यागोष्टीवर लक्ष देत काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असं नेटकऱ्यांचंही म्हणणं आहे.

ashadhi wari
'नागराज मंजुळेंना नकार दिला नसता तर...' मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली- तेव्हा पर्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.