Anant Radhika Wedding: रिलायन्स कर्मचाऱ्यांचीही झाली चांदी! अनंत राधिकाच्या लग्नानिमित्त मिळाल्या खास भेटवस्तू, शेअर केले व्हिडिओ

Gift For Reliance Employees On Anant Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त रिलायन्स आणि त्यांच्या इतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.
anant radhika wedding
anant radhika wedding
Updated on

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. आता नेटकरी त्यांना वरवधूच्या वेशभूषेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. तर गेला आठवडाभर त्यांचे लग्नाआधीचे विधी सुरू झाले होते. हळद, मेहेंदी, गरबा नाईट, शिव शक्ती पूजा, गृह पूजा या सगळ्या विधी पार पडल्या आहेत. आता लग्न काही तासांवर येऊन ठेपलं आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून महागडी गिफ्ट देण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर अंबानींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही खास भेट दिली आहे.

मुकेश व नीता अंबानींनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नानिमित्ताने रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू दिली आहे. रिलायन्स आणि जिओ कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूचा व्हिडिओ इतरांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओत, अंबानींकडून कर्मचाऱ्यांना एक मोठा असा लाल रंगाचा बॉक्स मिळाल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये चांदीचं नाणं, मिठाई, शेव, चिवड्याचं पाकिटं अशा खाण्याच्या वस्तू पाहायला मिळत आहेत. तसंच चांदीच्या नाण्यावर अनंत-राधिकाच्या नावाचं पहिलं अक्षर ‘अR’ असं लिहिण्यात आलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत कर्मचारी त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. रिलायन्समध्ये काम करण्याचे फायदे असं म्हणत त्यांनी हे व्हिडिओ शेअर केले आहेत.

आज १२ जुलै रोजी अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

anant radhika wedding
Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाचं लग्न कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर; बीकेसीतील कंपन्यांना १५ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम, 'हे' आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.