Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Parvin Dabas Accident: 'मोहब्बतें' अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती परवीन डबासचा अपघात झाला आहे. अभिनेता स्वतः कार चालवत होता आणि त्याच्यासोबत ही घटना घडली.
parveen dabas accident
parveen dabas accident esakal
Updated on

'मोहब्बतें' अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती आणि बॉलिवूड अभिनेता परवीन डबास याचा शनिवारी सकाळी अपघाता झाला आहे. या घटनेनंतर अभिनेत्याला आयसीयूमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री प्रीती झांगियानी आहे. 'खोसला का घोसला' या कॉमेडी चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला परवीन डबास कार अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी ते स्वतः कार चालवत होते. अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रिपब्लिक वर्ल्डच्या मते, या काळात अभिनेत्याच्या कुटुंबाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी गोपनीयता पाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी या निवेदनात लिहिलं की, 'प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास यांना शनिवारी सकाळी एका दुर्दैवी कार अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि ते वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहेत.'

कुटुंबाला मोठा धक्का

या घटनेचे अधिक तपशील अद्याप समोर आले नसले तरी, परवीनची डॉक्टरांकडून काळजी घेतली जात आहे. एबीपी लाइव्हच्या वृत्तानुसार, प्रीती झांगियानी हिने सांगितले की, ती आणि तिचे कुटुंबीय शॉकमध्ये आहेत आणि अधिक भाष्य करू इच्छित नाही. ते म्हणाले की, वैद्यकीय अपडेट्सनुसार परवीनला गंभीर दुखापत झाली आहे आणि डॉक्टर त्याची तपासणी करण्यासाठी सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करत आहेत.

परवीन डबासचे चित्रपट

परवीन 'खोसला का घोसला' या कॉमेडी चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखला जातो. तो 'रागिनी एमएमएस 2', 'इंदू सरकार' आणि 'माय नेम इज खान' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे. तो Amazon प्राइम व्हिडिओ सिरीज 'मेड इन हेवन' मध्ये शोभिता धुलिपाला सोबत दिसला होता.

parveen dabas accident
Phullwanti Trailer: एकदा पाहा, नजर हटणारच नाही! प्राजक्ताच्या 'फुलवंती'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.