तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

Deepti Devi Talking About Her Divorce: मराठी अभिनेत्री दीप्ती देवी हिने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर भाष्य केलंय. तिने तिचं लग्न का तुटलं याबद्दलही सांगितलंय.
deepti devi
deepti devi divorceesakal
Updated on

Entertainment News: अनेक मालिका आणि आता चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती देवी हिने स्वतःच्या मेहनतीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. 'नाळ', ‘नाळ २’, ‘पंचक’, ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली दीप्ती सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिप्तीने नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय. सोबतच ती आजपर्यंत या गोष्टीवर का बोलली नव्हती याचं कारणही सांगितलंय.

deepti devi
'फुलवंती'नंतर आराम करायला स्वतःच्या फार्महाउसवर पोहोचली प्राजक्ता माळी; नजारा पाहून नेटकरी म्हणाले- वाह...

या मुलाखतीत बोलताना दीप्ती म्हणाली, 'मी कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले नाही, कारण मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत कोणीही बाहेर चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. जर मी त्यांचे संरक्षण केले नाही तर कोणीही त्यांचे संरक्षण करणार नाही. मी सेलेब्रिटी असल्याने माझ्याकडे खूप पॉवर आहे. मी सांगण्याने खूप काही होऊ शकेल किंवा एकच बाजू मांडली जाईल. मला माझा संसार बघायला आवडलं असतं, पण ते नाही झालं.'

आपला संसार का तुटला याबद्दल बोलताना दीप्ती म्हणाली, 'मला माहीत नाही. कदाचित आम्ही एकमेकांना समजून घ्यायला किंवा स्वीकारण्यास पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. जसं मी खूप लहानपणी कामासाठी बाहेर पडले, त्यामुळे खूप लोकांबरोबर मला राहण्याची सवय आहे. मी सतत काम करत होते. काम करणं ही माझी आवड होती. मी कुठून आली आहे, हे त्याला कुटुंबाला कळणं किंवा सेलेब्रिटी म्हणून वेगळी आहे आणि एक मुलगी म्हणून वेगळी आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्या जर एकत्र झाल्या तर त्यामुळेही असू शकतं. आम्ही तीन वर्षे एकत्र होतो, त्यानंतर आपोआप जे झालं ते झालं. मी वेगळी होईन असा कोणीही विचार केला नव्हता.'

ती पुढे म्हणाली, 'पण, तुमच्याकडे इलाजच नसेल तर तुम्ही काय करणार? मला जितकं शक्य होईल तितकं मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की, काय चाललं आहे; काय करणं आवश्यक आहे. पण, मलाही कळायला माझा माझा वेगळा वेळ लागतो ना. माझ्या घरच्यांचं मत असं होतं की, तुम्ही दोघांनी बसून बोला. त्यांचं असं कधीच म्हणणं नव्हतं की तुझं सगळं बरोबर आहे आणि त्यांचं चुकलं आहे. सगळ्या पालकांना वाटतं त्याच्या मुलांनी खूश राहावं.'

deepti devi
'धर्मवीर २' चा ओटीटीवर बोलबाला! मोडला परेश मोकाशींच्या 'वाळवी'चा रेकॉर्ड, एका आठवड्यात मिळाले तब्बल इतके विव्ह्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()