सध्या बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही दाक्षिणात्य चित्रपटांचं वेड वाढत आहे. त्यात अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यात अनेक दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरत आहेत. मात्र जेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांचं इतकं प्रस्थ नव्हतं तेव्हाही एक अभिनेता बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होता तो म्हणजे नागार्जुन. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन हा फक्त साऊथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. अजूनही त्याच्या चित्रपटांची जादू कमी झालेली नाही. आता नागार्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
नागार्जुनला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या काही मोजक्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'मास' हा सिनेमा. या सिनेमाने तेव्हाही प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत येण्यास भाग पाडलं होतं. आता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणारआहे. नागार्जुनच्या वाढदिवसापूर्वी हा चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी नागार्जुनचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकगृहात प्रदर्शित होणार आहे. 'मास' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची जादू पाहायला मिळणार आहे. हा नागार्जुन यांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट आहे.
राघव लॉरेन्स दिग्दर्शित आणि अन्नपूर्णा स्टुडिओज अंतर्गत नागार्जुन याने स्वतः निर्मिती केलेल्या 'मास' मध्ये ज्योतिका, चार्मी कौर, रघुवरन आणि राहुल देव यांच्यासह अनेक कलाकार आहेत. नागार्जुन शेवटचा 'ना सामी रंगा' मध्ये दिसला होता आणि सध्या तो धनुष आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत 'कुबेरा' या त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.