Nana Patekar: 'वेलकम ३' मध्ये का नाहीयेत नाना पाटेकर? स्वतः सांगितलं कारण, म्हणाले-

Nana Patekar On Welcome 3: नाना पाटेकर यांनी मुलाखतीत 'वेलकम ३'मध्ये नसण्याचं कारण सांगितलं आहे.
nana patekar
nana patekar sakal

अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. काही चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शनही केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांसाठी अत्यंत वेळी होती. 'परिंदा', 'प्रहार', 'क्रांतिवीर', 'तिरंगा' यांसारख्या चित्रपटांमधील नाना पाटेकर सगळ्यांनी पाहिले. मात्र आपल्या अभिनयाला पैलू पडेल असा एक आगळा वेगळा चित्रपट नानांनी केला तो म्हणजे 'वेलकम'.मात्र आता 'वेलकम ३' मध्ये नाना का नाहीत याबद्दल त्यांनी स्वतः उत्तर दिलं आहे.

'वेलकम' या चित्रपटातील उदयचं पात्र नानांनी साकारलं होतं. या चित्रपटाने लोकप्रियतेचे रेकॉर्ड तोडले. त्यांचा 'जळता है तू मजनू' हा डायलॉगदेखील प्रचंड गाजला. त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता 'वेलकम ३' येत आहे. मात्र या चित्रपटात नाना नाहीयेत. त्याचं कारण सांगताना नाना म्हणाले, 'या चित्रपटाचा विषय खूप वेगळा होता. ही अनीझ बज्मीची फिल्म होती. पण मी आणि अनिल नाहीये तर हा चित्रपट पूर्ण नाही होऊ शकत. मी आणि अनिल नाही तर वेलकम नाही होऊ शकत. त्याला काढून टाकलं तर माझ्या एकट्याने नाही होणार, मला काढून टाकलं तर त्याच्याने नाही होणार.'

पुढे बोलताना नाना म्हणाले, 'हा या चित्रपटाचा दुसरा भाग आला होता पण तो इतका चालला नाही. आता चित्रपटाचा तिसरा भाग येतोय ज्यात आम्ही दोघेही नाहीयोत. त्यांनी विचारलेलं आम्हाला पण आम्ही नाही म्हणालो. कारण सांगायचं तर चित्रपटाची कथाच आम्हाला नाही आवडली. कथा एवढी चांगली नव्हती, एवढी मजा नाही आली. म्हणून नाही म्हणालो.' नाना या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलताना दिसत आहेत.

nana patekar
Bigg Boss OTT 3: माझ्या नकळत भेटले, बोलले... नवऱ्याकडून कशी झाली पायल मलिकची फसवणूक, सांगताना तिलाही अश्रू अनावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com