अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

Narendra Modi Emotional Letter After Atul Parchure Death: लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं पाच दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे.
narendra modi
narendra modi esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झालं. त्यांना कर्करोग झाला होता. त्यांनी या गंभीर आजाराशी यशस्वी झुंज दिली होती. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आणि अखेर त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. त्याक्षणाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अतुल यांच्या पार्थिव देहावर दादर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी चिन्मयी सुमित, निवेदिता सराफ, संजय मोने सगळेच प्रचंड दुःखी होते. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया परचुरे यांना सांत्वनपर पत्र लिहिलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलं, 'अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. ते सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते होते. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही. त्यांचं विनोदाचं टायमिंगही कमाल होतं. त्यांच्या कामामुळे ते कायमच आपल्या स्मरणात राहतील. अतुल परचुरे यांचं कार्य आणि विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहील. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि आठवणी हा कुटुंबासाठी आधार आहे. त्यांनादेखील कुटुंबाची, मित्रांची आणि चाहत्यांची आठवण येत असेल… पण ते कायम आपल्या हृदयात असतील. शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांनी शक्ती देवो… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.'

narendra modi letter
narendra modi letter esakal

अतुल परचुरे यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केलं होतं. ते 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून ते दमदार पदार्पण करणार होते मात्र त्यांपूर्वीच त्यांची प्रकृती ढासळली. आणि त्यांचं निधन झालं.

narendra modi
Bigg Boss 18 Eviction : नो गेम नो फेम, दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस १८'च्या घरातून बाहेर झाला 'हा' सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.