National Awards जिंकलेल्या 'वाळवी'ला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? जाणून घ्या सर्व विजेत्यांचे Prize Money

National Film Award 2024 Winner Prize money: नुकत्याच झालेल्या ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार यादीत 'वाळवी'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे.
national award prize money
national award prize money esakal
Updated on

Prize Money For National Film Award 2024 Winner: नुकतीच ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आज १६ ऑगस्ट २०२४ रोजी ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. या वेळेस परेश मोकाशी याच्या 'वाळवी' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. मल्याळम चित्रपट 'अट्टम' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला तर ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. गुलमोहरमधील अभिनयासाठी मनोज बाजपेयी याना विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला. मात्र या पुरस्कार विजेत्यांना पारितोषिक म्हणून काय मिळतं हे तुम्हाला ठाऊक आहे का?

कसे असतात पुरस्कार?

पुरस्कारांमध्ये स्वर्ण कमल, रजत कमल अशा दोन श्रेण्या असतात. त्यातील स्वर्ण कमल या श्रेणीत सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट हे विभाग असतात. त्यात

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: रु. 2,50,000

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रु. 2,50,000

सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट: रु. 2,00,000

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: रु. १,५०,०००

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट: रु. १,००,०००

दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार: रु. १,२५,०००

सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट: रु. 1 लाख

विशेष ज्युरी पुरस्कार: रु. 2,50,000

सर्वोत्कृष्ट समीक्षक पुरस्कार: 75,000 रुपये अशी रक्कम देण्यात येते.

तर रजत कमल श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक यासह विविध अभिनय आणि तांत्रिक पुरस्कारांचा समावेश आहे. या श्रेणीतील विजेत्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.

रजत कमल श्रेणीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार आणि सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे, जे दोन्ही रोख पारितोषिक 1,50,000 रुपये आहेत. वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाच्या नियमानुसार १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. ही माहिती फिल्मी बिट या वेबसाइटवरून घेण्यात आलेली आहे. .

national award prize money
National Film Awards: परेश मोकाशीच्या 'वाळवी'ने जिंकला राष्ट्रीय पुरस्कार; हा ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, वाचा विजेत्यांची नावं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.