गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःची घरं घेतली तर अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. कुणी साड्यांचा व्यवसाय सुरू केला तर कुणी नवं हॉटेल सुरू केलं. कुणी दागिन्यांचा ब्रँड सुरू केला तर कुणी पावभाजीची गाडी टाकली. प्राजक्ता माळी, अनघा अतुल, प्रार्थना बेहेरे, अक्षया देवधर या कलाकारांमध्ये आता आणखी एका कलाकाराच्या नावाचा समावेश झाला आहे. 'नवरी मिळे हिटलरला' ही झी मराठीवरील मालिका बरीच लोकप्रिय आहे. या मालिकेची आगळीवेगळी कथा आणि मालिकेतील कलाकार आज घराघरात पोहोचले आहेत. याच मालिकेतील कलाकाराने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील किशोर जहागीरदार म्हणजेच अभिनेता प्रसाद लिमये याने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्रसाद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन काहीतरी सुरू करणार असल्याचं सांगत होता. अखेर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या कलाकाराने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रसादने हॉटेल व्यवसाय पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. ‘अन्नपूर्णा’ असं प्रसादच्या हॉटेलचं नाव आहे. नुकताच एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, 'गणपती बाप्पा मोरया…अन्नपुर्णा प्रसन्न…अन्न हे पुर्णब्रह्म… जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तोच आनंद द्विगुणीत करायला आम्ही घेऊन येत आहोत खास ठाणेकरांसाठी ‘अन्नपुर्णा’ची मेजवानी. ‘अन्नपुर्णा’ क्लाऊड किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस आहे.' प्रसादच्या कामाबद्दल सांगायचं तर तो 'पुढचं पाऊल' या मालिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने ‘बेधडक’, ‘What’s up लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये काम केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.