Central Railway: एसीचं तिकीट काढा वर दंडपण भरा... वेळेवर नसलेल्या सेंट्रल रेल्वेवर भडकली 'तू तेव्हा तशी' फेम अभिनेत्री

Akshata Apte Post On Central Railway Bad management: मराठी अभिनेत्रीने सेंट्रल रेल्वेच्या भोंगळ कारभारावर प्रश्न विचारला आहे.
akshata apte
akshata aptesakal

सेंट्रल रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. त्यात सर्वसामान्य लोकांपासून कलाकारही असतात. मात्र मध्य रेल्वे कधीही वेळेवर नसते अशी अनेकांची तक्रार असते. रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणत सगळेच यागोष्टीकडे दुर्लक्ष करतात. प्रवासी रोज किड्यामुंग्यांसारखे प्रवास करतात. रेल्वेकडून यावर काही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यात एसी ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी आणण्यात आली मात्र तीदेखील कधीच वेळेवर नसते. आता एक मराठी अभिनेत्री सेंट्रल रेल्वेवर चांगलीच संतापली आहे. साध्या तर नाहीच पण एसी ट्रेनही वेळेवर येत नसल्याने तिने एक पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

काय आहे पोस्ट?

नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील अभिनेत्री अक्षता आपटे हिने एक पोस्ट शेअर केली आहे. अक्षताने पोस्ट करत लिहिलं, 'सेंट्रल लाइनवर एसी ट्रेन एकतर वेळेवर तरी याव्यात नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर टीसीने तिकीट नसेल तर फाइन न घेता असलेलं साधं किंवा फर्स्ट क्लासचं तिकीट तिथे अपग्रेड करून द्यावं. एसी ट्रेन पकडण्याच्या तयारीत एसीचं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो. आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं. एसीच्या तिकिटाचे पैसे वाया जातात. आणि जाऊदे आता एसी ट्रेन कधीच निघून गेली असेल असं म्हणून साधं किंवा फर्स्ट क्लासचं तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो. आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एटीव्हीएम मशिनसुद्धा नसतं.'

तिने पुढे लिहिलं, 'आणि मग त्या ट्रेनमध्ये चढून टीसी फक्त १५ रुपयांचा फरक असला तरी फाइन मारणार. म्हणजे ते पैसेही आपली चूक नसताना जावेत. असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी फर्स्ट क्लासचं तिकीट असताना शिस्तीत दंड भरलाय. अचानक इंडिकेटरवर एसी ट्रेन दिसल्यावर आठ नंबरवरून तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत ट्रेन गेलीये. या दोन्ही वेळेस मला कुठेतरी पोहोचण्याची घाई होती. पैसे वायाच दोन्हीकडे. यात चूक कोणाची?'

'ट्रॅफिकचा लोड कमी व्हावा, ट्रॅव्हल टाइम वाचावा आणि थोडा कम्फर्ट मिळावा म्हणून काढल्यात ना एसी ट्रेन? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकिटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या रेअर ट्रेन इतक्या बेभरवशाच्या असणं कसं चालेल? उलट त्या तर टॉप प्रायोरिटी असल्या पाहिजेत ना. काय वाटतं?' तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील तिची बाजू घेतली आहे.

akshata apte
जावेद अख्तर यांच्या पिण्याच्या सवयीला वैतागलेल्या शबाना आझमी; का घेतला दारू सोडण्याचा निर्णय? ३३ वर्षांनी सांगितलं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com