अखेर 'पारू' मालिकेत होणार खऱ्या खलनायिकेची एन्ट्री; 'मन झालं बाजींद' मधील अभिनेत्री साकारणार भूमिका

Zee Marathi Serial Paaru New Entry: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'पारू' मध्ये आता एका खलनायिकेची एंट्री होणार आहे. झी मराठीची नायिका आता खलनायिका म्हणून दिसणार आहे.
paaru serial
paaru serial esakal
Updated on

Entertainment News: छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही मालिका नव्याने भेटीला येणार आहेत. टीआरपीच्या यादीत सगळ्यात वर राहण्यासाठी आणि मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी सगळेच निर्माते जोर लावताना दिसतायत. त्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणण्यात येत आहेत. आता झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' मध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नव्या मेंबरची एंट्री होणार आहे. झी मराठीवरील जुनी अभिनेत्री नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही अभिनेत्री 'पारू' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

'पारू' मालिकेत नवी अभिनेत्री

'पारू' मालिकेत सध्या कोणताही खलनायक नाहीयेत यापूर्वी भरत जाधव यांची एंट्री दाखवण्यात आली होती. मात्र काही काळाने त्यांचं पात्र संपवण्यात आलं. दिशा मालिकेत खलनायिका दाखवण्यात आली होती. मात्र तीदेखील साईड लाइन झाली. आता एक मुख्य खलनायिका मालिकेत दाखवण्यात येणार आहे. झी मराठीवर नायिका म्हणून झळकणारी अभिनेत्री आता मालिकेत खलनायिका म्हणून दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे श्वेता खरात. 'मन झालं बाजींद' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात 'पारू' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

आता श्वेताच्या येण्याने मालिकेत नवनवे ट्विस्ट येणार हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षक आता मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अहिल्यादेवी आणि पारू यांच्यात दुरावा आणण्याचं काम श्वेता करणार असाही अंदाज लावण्यात येतोय.

paaru serial
अरे तिच्यावर दया करा रे... 'या' गोष्टीमुळे झी मराठीची 'सावळ्याची जणू सावली' मालिका ट्रोल; नेटकरी म्हणतात-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.