निळू फुलेंबद्दलच्या व्हिडिओवर गार्गी फुलेंचा संताप; माफी मागायच्या ऐवजी कन्टेन्ट क्रिएटरने कमेंटच केली डिलीट

Gargi Phule Angry Comment On Nilu Phule Video : एका मराठी कंटेन्ट क्रिएटरने निळू फुले यांच्या प्रमाणे पेहराव करून रील बाणवली मात्र त्यावर गार्गी फुले यांनी संताप व्यक्त केला.
Nilu Phule
gargi phuleesakal
Updated on

सध्या सोशल मीडियावर कन्टेन्ट क्रिएटरचा जमाना आहे. मराठी भाषेतील अनेक कन्टेन्ट क्रिएटर्स देखील आपल्या निरनिराळ्या कल्पना वापरून व्हिडिओ बनवताना दिसतात. मात्र कधीकधी याचा अतिरेक होताना दिसतो. अशाच एका मराठी क्रिएटरने दिग्गज लोकप्रिय अभिनेते निळू फुले यांच्याप्रमाणे पेहराव करून रील बनवली. मात्र निळू फुले हे केवळ एका वाक्यापुरते मर्यादित नव्हते. त्याच्या या रीलवर निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा मात्र या कन्टेन्ट क्रिएटरने तो व्हिडिओ डिलीट करायच्या ऐवजी त्यांच्या कमेंट डिलीट केल्या. असं काय म्हणाल्या होत्या गार्गी फुले आणि ती रील नेमकी कोणती आहे?

निळू फुले यांचा 'बाई वाड्यावर या' हा संवाद प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र त्यांच्या अभिनयाची पोहोच यापेक्षा कित्येकपटीने जास्त होती. प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारे निळू फुले यांनी समाजकार्यातही मोठं योगदान दिलं आहे. असं असताना पवन वाघूलकर आणि सायली पाठक या दोन कंटेन्ट क्रिएटर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ‘बाई वाड्यावर या…’ या वाक्याचा वापर केलाय आणि त्यांच्यासारखे कपडे घालून त्यांच्या नावाचाही वापर केलाय हे पाहून गार्गी यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी प्रतिक्रिया देत लिहिलं, 'हे किती हिडीस आहे. कृपया माझ्या बाबांना असं बदनाम करु नका. सायली फाटक तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'.

प्रसाद ओकने दिली प्रतिक्रिया

गार्गी यांच्या या वक्तव्यावर प्रसाद ओकने देखील प्रतिक्रिया दिली. 'निळू फुले कोण होते आणि काय दर्जाचे होते हे समजायला यांना १००००० जन्म घ्यावे लागतील. गार्गी फुले सोडून दे. 'निळू फुले' म्हणजे 'बाई वाड्यावर या..'एवढीच यांची कुवत आहे'' असं प्रसादनं म्हटलं. मात्र या कन्टेन्ट क्रिएटर्सनी त्यांची माफी मागण्याऐवजी त्यांच्या कमेंट डिलीट केल्या. त्यांच्या कमेंटबद्दल आता इतर नेटकरीही विचारणा करत आहेत.

Nilu Phule
मायरा वायकुळच्या भावाला पाहिलंत का? दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवला चेहरा, नेटकरी म्हणतात- हा तर हुबेहूब...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.