Nikki Tamboli: प्लास्टिक सर्जरीपूर्वी अशी दिसायची निकी तांबोळी; जुने फोटो पाहून ओळखूही येणार नाही

Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli Old Photos: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात आडमुठेपणा करणाऱ्या निकी तांबोळीचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
nikki tamboli
nikki tamboliesakal
Updated on

Nikki Tamboli Plastic Surgery: छोट्या पडद्यावर सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठी ५' ची. हा सीझन प्रचंड गाजतोय. हा सीझन गाजण्याची कारणं म्हणजे घरात आलेले स्पर्धक आणि कार्यक्रमाचा बदललेला होस्ट. या सीझनमध्ये टीम ए आणि टीम बी दोन्ही चर्चेत आहेत. त्यातही चर्चेत आहे ती टीम ए मधील लोकप्रिय अभिनेत्री निकी तांबोळी. निकीने घरात आल्यापासूनच सगळ्यांशी पंगा घेतला. कधी वर्षा उसगावकर यांच्याशी भांडली तर कधी कामावरून घरात राडा केला. मात्र निकीच्या वागण्यासोबतच तिचं दिसणंही सोशल मीडियावर चर्चेत असतं. मात्र निकीने तिच्या शरीराची प्लास्टिक सर्जरी केली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'बिग बॉस मराठी ५' च्या घरात येण्यापूर्वी निकीने अनेक हिंदी मालिका आणि टीव्हीशो गाजवले आहेत. तिने 'खतरो के खिलाडी' आणि 'बिग बॉस १४' मध्ये सहभाग घेतला होता. त्यात निकीचा चेहरा अगदी वेगळा होता. बिग बॉस १४ मध्ये निकीच्या सौंदर्याचे अनेक चाहते वेडे होते. तिचा लूक अतिशय वेगळा होता. साधी सुंदर दिसणारी निकी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. मात्र 'बिग बॉस मराठी ५'मध्ये येण्यापूर्वी तिने तिच्या चेहऱ्यावर सर्जरी करून घेतली. तिने तिच्या ओठांवर सर्जरी केली आहे. त्यामुळे ते आधीपेक्षा जास्त मोठे दिसत आहेत. तर तिने तिच्या गालांवरही सर्जरी केल्याचं बोललं जातं. ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक बदलला आहे.

तिने जुने फोटो पाहून तिच्या चाहत्यांनाही निकी ओळखू येत नाहीये. काही तिला या सर्जरीसाठी पाठिंबा देत होते. तर बहुतांश तिच्या या सर्जरीच्या विरोधात होते. तिची लीप सर्जरी पूर्णपणे फसली असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. तू आधी जास्त चांगली दिसत होतीस अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या होत्या. आता निकी 'बिग बॉस मराठी ५' मध्ये शेवट्पर्यंत राहणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

nikki tamboli
Bigg Boss Marathi Season 5 : "मी असं फालतू ऐकून घेणार नाही..", इरिनामुळे वैभवने निक्कीला चांगलच सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.