Nilu Phule: आणि विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण निळू फुलेंनी नाकारला; थेट सीएमना दिलेला नकार, कारण फक्त एकच की...

Nilu Phule Untold Story: आणि निळू फुले यांनी विलासराव देशमुख यांना नकार दिला होता. तो पुरस्कार नंतर दुसऱ्या व्यक्तींना देण्यात आला.
nilu phule
nilu phule sakal
Updated on

मराठी सिनेसृष्टी ही अभिनेते निळू फुले यांच्याशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. कधी प्रेमळ तर कधी वाईट भूमिका साकारून त्यांनी चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. आजही त्यांच्या अभिनयाचा आणि आवाजाचा दबदबा प्रेक्षकांमध्ये आहे. पण निळू फुले हे फक्त अभिनयातच नाही सामाजिक कामातही पुढे असायचे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा आदिवासींचे प्रश्न असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपलं योगदान दिलं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २००३ साली त्यांना महाराष्ट्र्र भूषण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निळूभाऊंनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. काय म्हणालेले निळू फुले?

२००३- २००४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आदरणीय नेते विलासराव देशमुख विराजमान होते. निळू भाऊंची कामाची दखल घेत त्यांनीच हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेव्हा त्यांनी अभिनेत्यांना फोन केला तेव्हा त्यांना अपेक्षित नसलेली गोष्ट घडली. विलासरावांनी निळू फुले यांना फोन केल्यावर ते म्हणाले, 'शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. आता फक्त यासाठी तुमची संमती हवी. म्हणजे आम्हाला पुरस्कार जाहीर करता येईल.'

त्यावर निळू फुले यांनी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले, 'या पुरस्कारासाठी तुम्हाला मी योग्य वाटलो त्याबद्दल तुमचे आभार. पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही. मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे.'

विलासराव ऐकतच राहिले

पुढे निळू फुले म्हणाले, 'एक बोलू का, तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असेल तर तो डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला मोठं काम केलेले आहे. हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा.' निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले. त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला. यासंपूर्ण प्रकरणात निळू फुले यांच्या मनाचा मोठेपणा तर दिसलाच पण त्यासोबतच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही मनाच्या मोठेपणाचं दर्शन झालं. कारण त्यांनी निळू फुले यांनी दिलेला नकार कोणताही राग न ठेवता मान्य केला.

nilu phule
Bigg Boss OTT 3: घरात दिसला लांबलचक साप; नेटकऱ्यांची भीतीने उडाली गाळण, वाचा नेमका कुठे आहे बिग बॉसचा सेट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.