Bigg Boss marathi 5
Bigg Boss marathi 5 esakal

डीपीने टाकलं सुरजला मागे अन्... बिग बॉसच्या घरातील सगळ्यात लोकप्रिय स्पर्धक कोण? वाचा कोण कुठल्या स्थानावर

Bigg Boss Marathi 5 Favourite Contestant List: 'बिग बॉस मराठी'च्या घरात लोकप्रियतेच्या बाबतीत कोण कितव्या स्थानी आहे हे समोर आलं आहे. पाहा यादी.
Published on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दररोज नवनवे खेळ खेळले जात आहेत. मागच्या दोन आठवड्यात घरात बरंच काही घडलं आहे. संग्राम हा वाईल्ड कार्ड म्हणून आला आणि त्याने दोन ग्रुप नक्कीच पडले. जान्हवीने संग्रामसोबत राहणं जास्त फायद्याचं समजलं. तर धनंजय पोवारने अंकिता आणि अभिजित यांची साथ सोडून स्वतःचा वेगळा खेळ दाखवण्याचा निर्णय घेतला. सुरज अजूनही स्क्रीनवर दिसत नाहीये तर आर्या जाधव आणि वैभव घराबाहेर झालेत. अशातच आता मागच्या आठवड्याचा लोकप्रिय स्पर्धकाचा रिपोर्ट आला आहे. यात कोणता स्पर्धक पहिल्या क्रमांकावर आहे हे पाहूया.

संग्रामची लोकप्रियता घसरली

या आठवड्यात निक्कीची पॉप्युलॅरीटी घसरलीये आणि ती थेट दहाव्या क्रमांकावर पोहोचलीये. तर अरबाज नवव्या स्थानावर आहे. नुकताच घरात आलेला संग्राम याची पॉप्युलॅरिटीही घसरली आहे आणि तो आठव्या क्रमांकावर गेलाय, तर वर्षा उसगावकर सातव्या स्थानावर आहेत. तर या आठवड्यात जान्हवीची लोकप्रियता वाढली आहे. ती थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि पाचव्या क्रमांकावर अभिजित आहे. तर चौथ्या क्रमांकावर पंढरीनाथ कांबळे आपली लोकप्रियता टिकवून आहेत.

पहिला क्रमांक कुणाचा?

या आठवड्यात सुरजची लोकप्रियताही कमी झाली आहे. त्याची जागा धनंजय पोवार यांनी घेतली आहे. धनंजय आता गेमवर फोकस करणार आहेत. तर मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही कोकणची चेडू अंकिता वालावलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तिच्या चांगल्या गेमचा तिला बराच फायदा होत आहे. प्रत्येक चुकीच्या ठिकाणी स्टॅन्ड घेणं आणि स्वतःचं मत मांडणं, स्वतःचा वैयक्तिक गेम खेळणं यामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होत आहे. आता पुढील आठवड्यात यात बदल होण्याची शक्यता आहे.

Bigg Boss marathi 5
बिग बॉस फेम अब्दू रोजिकचं लग्न तुटलं; 5 महिन्यांपूर्वीच झालेला साखरपुडा; तिने नाही त्यानेच दिला नकार कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...