चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहायला अनेकांना आवडतं. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजाच काही और असते. तिथला आवाज, तिथलं वातावरण सगळंच भारावून टाकणारं असतं. मात्र या तिकिटांची किंमत कधीकधी खूप जास्त असते. प्रत्येकालाच ही तिकिटं परवडतील असं नाही. मल्टिप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडिया दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट दिन घोषित करतं. यावर्षीही तो घोषित करण्यात आला आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात प्रेक्षक कोणतेही चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहू शकतात. वाचा कसा घ्याल या ऑफरचा लाभ.
राष्ट्रीय मल्टिप्लेक्स व्यापार संस्थेच्या प्रेस रिलीझनुसार, २० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा करण्यात येणार आहे. २० सप्टेंबरला प्रेक्षकांना PVR INOX, Cinepolis, Miraj, Movie Time आणि Delite सारख्या अनेक थिएटरमध्ये प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयात चित्रपट पाहता येणार आहेत. या शुक्रवारी प्रेक्षकांकडे अनेक चित्रपटांचे पर्याय आहेत. 'युद्ध', 'कहां शुरू कहां खतम', 'नवरा माझा नवसाचा – २', 'सुचा सूरमा', 'नेव्हर लेट गो' आणि 'ट्रान्सफॉर्मर्स वन' या चित्रपटांसोबत गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले 'तुंबाड', 'वीर झारा' हे चित्रपटही आहेत.
हे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. तुम्ही इतर दिवशी चित्रपटांसाठी जसे तिकिट बूक करता तसेच करायचे आहेत. ऑनलाइन किंवा तिकीट खिडकीवर जाऊन फक्त तिकिटाची विचारणा करायची आहे. तुम्हाला ९९ रुपयात चित्रपट पाहता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.