National Films Awards 2024 winners list: आज १६ ऑगस्ट रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा शुक्रवारी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे करण्यात आली. यात प्रत्येक सिनेसृष्टीतील अनेक चित्रपट आणि कलाकारांना नामांकनं देण्यात आली होती. आता अखेर विजेत्यांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सूरज बडजात्या यांना त्यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटासाठी मिळाला. पोनियिन सेल्वन I, KGF 2, ब्रह्मास्त्र आणि अपराजितो या चित्रपटांनादेखील पुरस्काराने गौरवण्यात आलं.
अभिनेता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्या 'वाळवी' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपटावर मोहोर उमटवली आहे.
बॉलिवूड संगीतकार प्रीतमला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला.
मल्याळम चित्रपट 'सौदी वेल्लाक्का' सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मल्याळम चित्रपट 'अट्टम'ने सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जिंकला.
बॉलिवूडमध्ये मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका असलेल्या 'गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
'दमन' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपटाचा पुरस्कार 'बागी दी धी'ने पटकावला.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, 'सिक्यसल' सर्वोत्कृष्ट तिवा चित्रपट ठरला.
'उंचाई'साठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अट्टम या मल्याळम चित्रपटाने जिंकला.
'थिरुचित्रंबलम'साठी नित्या मेनन आणि 'कच्छ एक्सप्रेस'साठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
ऋषभ शेट्टीला 'कांतारा'मधील कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मल्याळम चित्रपट 'अट्टम'ने सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.
नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'पोनियिन सेल्वन 1' सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे.
'कार्तिकेय 2' ने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.
मनोज बाजपेयी यांना गुलमोहरसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे.
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपट 'ऑन द ब्रिंक सीझन 2' आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट 'मुर्मर्स ऑफ द जंगल'ने जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.