Phir Aayi Hasseen Dillruba: पुन्हा चालली तापसीची जादू? नेटकऱ्यांनीच दिला निर्णय,चित्रपट पाहण्याआधी वाचा ट्वीटर रिव्ह्यू

Phir Aayi Hasseen Dillruba Movie Tweeter Review: 'फिर आई हसीन दिलरुबा' हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी आपली मतं देखील दिली आहेत.
Phir Aayi Haseen Dillruba
Phir Aayi Haseen Dillrubaesakal
Updated on

Taapasee Pannu And Vikrant Massey Starrer Phir Aayi Haseen Dillruba: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेता विकी कौशल यांचा 'फिर आई हसीन दिलरुबा' आज ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 'हसीन दिलरुबा'चा सिक्वेल आहे. पहिला भाग जरी प्रेक्षकांना आवडला असला तरी आता आलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही यात सगळ्यांनाच शंका होती. मात्र या चित्रपटाने सगळ्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवल्या आहेत. नेटकरी या चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. तर चाहत्यांनी चित्रपटातील तापसीच्या भूमिकेला आणि तिच्या अभिनयाला १०० पैकी १०० गुण दिले आहेत. तर विक्रांत आणि सनी यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटात जीव ओतला आहे. या तिघांनीही चित्रपटात कुठेही कसलीही कमी ठेवलेली नाही.

ट्विस्ट अँड टर्नचं होतंय कौतुक

ट्विटरवर चित्रपटाचे मिश्र रिव्ह्यू येत आहेत. काहीही या चित्रपटाला सुपरहिट म्हटलं आहे. तर काही प्रेक्षकांनी 'फिर आई हसीन दिलरुबा' ला ओटीटी ऐवजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. एका युझरने लिहिलं, 'आताच तापसी आणि विक्रांत मेस्सी यांचा 'फिर आई हसीन दिलरुबा' बघितला. पहिल्या सीनपासून शेवट्पर्यंत हा चित्रपट प्रेम आणि धोक्याची एक पर्वणी देतो. ही कथा तुम्हाला खिळवून ठेवतेय. तुमची नजर हटू देत नाही.'

सिक्वेलचं कौतुक करताना आणखी एका युसरने लिहिलं की, 'मला 'हसीन दिलरुबा'पेक्षा 'फिर आयी हसीन दिलरुबा' जास्त आवडला आहे. हे खूप अवघड आहे, परंतु व्हिज्युअल्स कथेतील कमतरता भरून काढतात. नदीतील एक शॉट असाच तुमच्या डोक्यात अडकून राहतो. तो माझ्या मनात आताही आहे. '

आणखी एकाने लिहिलं, 'हसीन दिलरुबा तुमचं मन जिंकण्यासाठी पुन्हा आलीये. राणी सक्सेना पुन्हा एकदा तयार आहे. तुम्ही तयार आहात का?तिने पुन्हा एकदा स्वतःची छाप पाडली आहे.' असं म्हणत अनेकांनी चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या टिमचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट मस्ट वॉच नक्कीच आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Phir Aayi Haseen Dillruba
Samantha Divorce: का झालेला सामंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? कुटुंबाचा तो निर्णय ठरलेला मोठं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.