मराठी सिनेसृष्टीला धक्का! 'नक्षत्रांचे देणे' फेम गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन; सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

Mukund Phansalkar Death: मराठी सिनेसृष्टीने आणखी एक हरहुन्नरी कलाकार गमावलाय. मराठी गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालंय.
mukund fansalkar
mukund fansalkar esakal
Updated on

गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीने अनेक हिरे गमावले. आता त्यातील आणखी एक हिरा आपण गमावलाय. मराठी प्रेक्षकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फणसळकर यांचं निधन झालंय. मुकुंद यांनी 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपल्या आवाजाची भुरळ पाडली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. मात्र मुकुंद यांनी या जगाचा निरोप घेतलाय. लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिलीये. गेले काही दिवस ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतंय. मराठी प्रेक्षकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.