प्रियांका चोप्राला खायला आवडतो 'हा' झणझणीत मराठमोळा पदार्थ; नऊवारी की सहावारीमध्ये निवड करत म्हणाली-

Priyanka Chopra Favourite Place In Maharashtra : प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'पाणी' या चित्रपटासाठी सोशल मीडियावर चर्चत आहे. एका मुलाखतीत तिने तिचा आवडता पदार्थ सांगितला आहे.
priyanka chopra
priyanka chopra esakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'पाणी' या चित्रपटासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची ती निर्माती आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका आता दोन मराठी चित्रपटांची निर्माती झाली आहे. यापूर्वी प्रियांकाने 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचं देखील प्रचंड कौतुक झालं होतं. आता 'पाणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने तिचा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ सांगितला आहे. ती महाराष्ट्रातील मराठी पदार्थांपैकी सगळ्यात जास्त काय आवडतं हे तिने सांगितलं आहे. सोबतच महाराष्ट्रात तिला कुठे फिरायला आवडतं हे देखील तिने सांगितलं आहे.

'पाणी' निमित्त प्रियांकाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला नऊवारी साडी की सहावारी साधी साडी असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली,'नऊवारी साडी माझ्यावर खूप छान दिसते. मला खूप आवडते.' त्यानंतर वडापाव की पावभाजी प्रश्नावर तिने पावभाजी असं उत्तर दिलं. एक आवडता मराठी चित्रपट म्हणून तिने 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाचं नाव घेतलं. तर प्रियांकाचा आवडता मराठी शब्द विचारताच तिने 'आईचा' असं उत्तर दिलं. तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ सांगताना प्रियांका म्हणाली, 'मी तर काहीही महाराष्ट्रीयन पदार्थ खाऊ शकते पण महाराष्ट्रीयन ना मिरची खूप छान पद्धतीने वापरतात. तर मला ठेचा खायला खूप आवडतं. मी नॉर्थ इंडियन पदार्थ आणि साऊथ इंडियन पदार्थ एकत्र करून खाते. म्हणजे मी ठेचा पराठ्यासोबत खाते.'

पुढे तिला महाराष्ट्रातील आवडतं ठिकाण विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, 'मला पुणे खूप आवडतं आणि लोणावळा आवडतं. तशी मी महाराष्ट्रात खूप ठिकाणी फिरली आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आत गेलात तर महाराष्ट्र खूप छान आहे.' प्रियांकाच्या पाणीसोबतच तिच्या 'जी ले जरा' या हिंदी चित्रपटाचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

priyanka chopra
ऑक्टोबरमध्ये कुठल्या झाडाला आंबे लागतात? 'लाडकी बहीण'वरून अमृता खानविलकर ट्रोल, नेटकरी म्हणाले- चंद्रा बाई..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.