phullwanti
phullwanti esakal

प्रवीण तरडेंसोबत टोकाचा वाद झाला, 'फुलवंती'चं शूटिंग थांबलं; प्राजक्ता माळी म्हणाली- तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असं...

Prajakta Mali Fight WIth Pravin Tarde: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हीच 'फुलवंती' चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये गाजतोय. मात्र आता या चित्रपटाबद्दलचा एक किस्सा तिने सांगितला आहे.
Published on

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या अभिनयासोबतच आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती सध्या 'फुलवंती' या चित्रपटात झळकतेय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. असं असलं तरी प्राजक्ता ही या चित्रपटाची निर्माती देखील आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्राजक्तावर स्वतःचं घर विकायची वेळ आलेली. आता एका मुलाखतीत तिने याबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यात तिने तिच्या आणि प्रवीण तरडे यांच्या भांडणाबद्दलही सांगितलं आहे. त्यांचा वाद इतका टोकाला गेला होता की चित्रपटाचं शूटिंगही बंद पडलं होतं.

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ताने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, 'हो, या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान माझ्यात आणि प्रवीण तरडे यांच्यात मतभेद झाले होते. काही काळ शूटिंग थांबलं होतं. थोडा त्रास झाला पण त्यांनी जे शिकवलं ते महत्वाचं. म्हणजे काहीतरी घर्षण असलं पाहिजे. जेव्हा एक बाजू आणि दुसरी बाजू एकमेकांना धडकते तेव्हाच काहीतरी तिसरं निरमा होतं आणि ते चांगलं असतं. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असं झालं तर ते चूक होऊ शकतं. एका पॉईंटला असं वाटू शकतं की मी वयाने लहान आहे, कर्तृत्वाने लहान आहे. आणि मी चांगलं किंवा वाईट म्हणा पण मोठ्या पोझिशनला बसलीये तर ते कधी कधी लोकांना सहन होतं, कधी कधी होत नाही. कधी कधी सलतं.'

ती पुढे म्हणाली, 'कधी कधी मत्सर निर्माण होतो. या सगळ्यातून मला जावं लागलं. पण मी म्हणेन शेवटचा रिझल्ट खूप महत्वाचा आहे. आता त्यांच्यापेक्षा जास्त अभिमान या चित्रपटाविषयी कुणाला वाटत नाही. इतके या चित्रपटाविषयी पॅशनेट झालेत ते. मी आता १ तास बोलत आलीये त्यांच्याशी की शो नीट बघ. तुझं अजून रील का नाही आलंय, ते गाणं वाजव. कळतंय का की मतभेद झालेच नाहीत तर कसं कळणार? संघर्ष हा व्हायलाच हवा. त्याच्याशिवाय काही चांगलं निर्माणच होणार नाही.'

phullwanti
रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...