Phullwanti: प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' मध्ये दिसणार 'हे' कलाकार; समोर आली स्टार कास्ट, फोटो चर्चेत

Prajakta Mali's Phullwanti Cast Reveals: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या 'फुलवंती' चित्रपटाची स्टारकास्ट आता समोर आली आहे.
phulwanti
phulwanti esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीला आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने अनेक हिट मालिका आणि चित्रपटात काम केलं. तिने आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने स्वतःच्या बळावर एक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला, सोबतच तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊसदेखील सुरू केलं. आता याच प्रोडक्शन हाउसच्या बॅनरखाली एक तगडा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो म्हणजे 'फुलवंती'. यापूर्वी 'फुलवंती' चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं होतं. त्यानंतर प्राजक्ताचं टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलं. आता या चित्रपटातील कलाकारांची नावं समोर आली आहेत. पाहूया या चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत.

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केला आहे. यात चित्रपटातील सगळेच मुख्य कलाकार दिसत आहेत. यापूर्वी चित्रपटात गश्मीर महाजनी असणार आहे याचा खुलासा झाला होता.आता इतर कलाकारांची नावंही समोर आली आहेत. चित्रपटात प्राजक्तासोबत अभिनेता प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितिज दाते, ह्रषीकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, दीप्ती लेले हे कलाकार दिसणार आहेत. या कलाकारांचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.

ही पोस्ट करत प्राजक्ताने लिहिलं, 'देवाचे किती आभार मानू…फुलवंतीला अशा तगड्या कलाकारांची साथ मिळाली…गुणवंत, किर्तीवंत, प्रतिभावंत, कलावंतांच्या संगतीनं सजलेली अभिजात कलाविष्काराच्या अदाकारीने नटलेली ‘फुलवंती’. आपल्या भेटीला येतेय जवळच्या चित्रपटगृहात ११ ॲाक्टोबर पासून. #PanoramaStudios सादर करीत आहेत... मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय....’फुलवंती’.' हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

phulwanti
Upendra Limaye : काय सांगता! अभिनेता उपेंद्र लिमये मिरवणुकीत वाजवतोय ताशा? हा व्हिडिओ पाहून नेटकरीही झिंगले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.