Prajakta Mali: जवळच्या माणसांनीच फसवणूक केली; प्राजक्ता माळीने सांगितला कठीण काळ, म्हणाली- आईने तर घर विकायला...

Prajakta Mali Reveal Anout Her Tought Patch: लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिचा अनुभव सांगितला आहे. जेव्हा ती जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसली होती.
prajakta mali
prajakta maliesakal
Updated on

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात गश्मीर महाजनी देखील मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असताना आता प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती तिच्या आयुष्यातला कठीण काळ सांगताना दिसतेय. आपण जवळच्या माणसांवर विश्वास ठेवून फसलो असं ती म्हणतेय.'

प्राजक्ताने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की ज्या माणसांवर मी विश्वास ठेवला त्याच माणसांनी माझं नुकसान केलं. परत त्यानंतर मला अशी काही माणसं मिळाली, जेव्हा मला वाटलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते तेच मला या सगळ्यातून तारू शकतील. त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण तेव्हा मला आतून जे वाटलं ते मी करत राहिले. आणि आज या गोष्टीमुळे मला खूप आनंद होतोय की ते सगळं पूर्णत्वाला येतंय. या प्रवासात माझ्या घरच्यांनी कधीच साथ सोडली नाही. ते कायम माझ्यासोबत राहिले.'

प्राजक्ता पुढे म्हणाली, 'इतके चढ उतार असतानाही ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. मला एका क्षणाला माझी आई म्हणत होती, तुला घर विकायचं असेल तर विक काही हरकत नाही. पैसे कमी पडतायत, टाकावे लागतायत तर टाक. शेड्यूल कॉल ऑफ होतंय तर तसं करू नको. तू घर विक आणि हा चित्रपट पूर्ण कर. मला माहिती आहे हा चित्रपट सक्सेसफुल होणार आहे आणि तू अशी चार घरं उभी करणार आहेस. हे माझं आणि आईचं रात्री साडेबार वाजताचं बोलणं होतं. अवघ्या १५ दिवसांवर शूट होतं आणि ते लागत नव्हतं. या लेव्हलला फॅमिली सपोर्ट असतो ना की त्यांना माझ्यावर विश्वास आहे की मी आतापर्यंतची सगळी जमापुंजी पणाला लावली तरी देखील ते माझ्या बाजूने उभे आहेत.'

prajakta mali
प्रवीण तरडेंसोबत टोकाचा वाद झाला, 'फुलवंती'चं शूटिंग थांबलं; प्राजक्ता माळी म्हणाली- तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असं...

पुढे प्राजक्ता म्हणाली, 'तेव्हा मीच शेड्यूल कॉल ऑफ केलं होतं कारण आतापर्यंत जमावलेली पुंजी मी अशी नाही लावू शकत. तरीही त्यांनी मला सपोर्ट केला. सेकंड शेड्यूलला तर माझा भाऊ आणि दोघेही माझ्यासाठी सेटवर आले होते. तो काळ खूप कठीण होता.'

prajakta mali
अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.