Latest Entertainment News: मराठी सिनेविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री प्रणित हाटे हिने 'कारभारी लयभारी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रणितने ट्रान्सवूमन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिला चाहते गंगा नावानेदेखील ओळखतात. ती उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच सोबतच ती उत्तम नृत्यांगना देखील आहे. मात्र तिचा बालपणापासूनचा प्रवास अतिशय कटू होता. ट्रान्सवूमन म्हणून तिला अनेकदा अनेकांचे टोमणे आणि मारही खावा लागला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
प्रणितने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'मला माझं बालपण पुन्हा जगायचं नाही. माझ्या लहानपणी चांगल्या गोष्टी घडल्याचं नाहीत. जेव्हा मी लहान होती तेव्हा मी इतर मुलांसारखी नव्हते. तेव्हापासूनच हा बायल्या आहे, हा छगन आहे असे चिडवायचे लोकं. मलाही वाटायचं की इतर मुलांमध्ये जाऊन खेळावं. जेव्हा बाहेर चिडवतात हे घरी जाऊन सांगायचे तेव्हा मलाच मारलं जायचं की तूच तुझी वागणूक सुधार. बाकीची मुलं कशी खेळतात, कशी चालतात तसं चाल. मग माझा वेळ मुलींसोबत भांडी भात खेळण्यातच जायचा. माझे नातेवाईकही चिडवायचे. कधी मी कुणा नातेवाईकाच्या लग्नाला गेले तर अरे हा तर बायल्या आहे. माझे एक नातेवाइक म्हणायचे सहा नंबर आहे. तेव्हा सहा नंबर काय हेच कळायचं नाही.'
प्रणित पुढे म्हणाली, 'शाळेत मला मुलांनी खूप त्रास दिला. मी वॉशरूमला गेले तर माझी पॅन्ट खेचायचे. मला वॉशरूममध्ये लॉक केलेलं. शाळेत मुलं तर चिडवायचीच, मारायची पण टीचरसुद्धा मला चिडवायचे. मग त्यांची तक्रार मी कुठे करायची? जेव्हा मला घरी आकांत मिळायचा. म्हणजे बाबा कामावर जायचे, आई भाजीला वगरे जायची तेव्हा मी आईची साडी नेसून आरशासमोर उभी राहायचे. बांगड्या घालून. सतत एक नवरी बनायचं माझ्या डोक्यात होतं. छान लांब केस आहेत असं मानायचे. पण एकदा मला आईने असं साडीवर पकडलं.'
'काकानेदेखील पाहिलं तेव्हा मला त्यांनी खूप मारलंय. की काय हे सगळं, कशासाठी हे सगळं सुरू होतं. घरच्यांनी खूप मारलं मला हे बदलावं म्हणून. मी कॉलेजमध्ये आले तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी होती. इथे मला माझ्यासारखे काही लोक भेटले. मला मला गे आणि ट्रान्सजेण्डर सारख्या व्याख्या समजल्या.' या मुलाखतीत तिने आपला आजवरचा प्रवास सांगितला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.