काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बापट हिची एक मुलाखत खूप चर्चेत होती ज्यात ती लग्नानंतर मूल न झाल्याबद्दल बोलत होती. प्रिया आणि उमेश कामत यांच्या लग्नाला १३ वर्ष उलटूनही अद्याप बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यावरून अनेक चाहते त्यांना प्रश्न विचारत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने त्यांना उत्तर देत आम्हाला सध्या मूल नकोय. जर मला वाटलं वयाच्या ४२ व्या वर्षी मी मूल जन्माला घालेन किंवा घालणारही नाही, असं उत्तर प्रियाने दिलं होतं. मात्र प्रिया आणि उमेश हे एकच जोडपं असं नाहीये ज्यांनी बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतलाय. यामागे प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. पाहुयात अशा कलाकारांची नावं.
अभिनेते मिलिंद पाठक यांनी लग्नाआधीच मूल नको असा निर्णय घेतला होता. वयाच्या २३- २४व्या वर्षीच बाळ नको असं त्यांनी ठरवलं होतं. बाळ जन्माला घातल्यानंतर जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या घ्यायची माझी तयारी नव्हती...हे मी माझ्या पत्नीलाही सांगितलं, त्यामुळं हा निर्णय घेतला होता, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी मूल नको असल्याचा निर्णय घेतलाय. याबद्दल बोलताना अमृता म्हणालेली, 'आम्हाला लहान मुलं आवडतात पण, मुलं आवडणं आणि वाढवणं यात फरक असतो, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये इतके व्यग्र आहोत. मग आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का, त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय.'
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि तिच्या पतीने देखील आपल्याला मूल नको असं ठरवलं आहे. २०१७मध्ये प्रार्थनानं लग्न केलं. त्यानंतर अनेकदा तिच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या. मात्र प्रार्थनानं बाळ नकोय, हा निर्णय घेतलाय. मला आणि माझ्या नवऱ्यालाही मूल नकोय. हे आमच्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांनाही आमचा निर्णय पटला. आमच्या घरात जे पेट्स आहेत, तिच आमची मुलं आहेत, असं प्रार्थना तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून म्हणाली होती.
अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री अंजली कुलकर्णी यांनीही बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतलाय. याबद्दल बोलताना अतुल म्हणाले, 'आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि आहोत. आमच्यात चांगला संवाद होतो हे महत्वाचं वाटतं. पारंपरिक नवराबायको हे मला पटत नाही. एका छताखाली आमची २ विश्व आहेत. आम्ही त्यामुळे आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.