घरी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसादला सगळ्यात आधी विचारला तो प्रश्न; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

Prasad Oak Get Surpised By Cm Eknath Shinde Visit: अभिनेता प्रसाद ओक याचा 'धर्मवीर २' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक किस्सा सांगितला आहे.
prasad oak
prasad oakesakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक याने 'धर्मवीर' मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्याने धर्मवीरमध्ये आनंद दिघे यांची भूमिका हुबेहूब साकारली. त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. आता तो 'धर्मवीर २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रसाद या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा त्यांनी प्रसादला दिलेला शब्द पाळला होता आणि त्या प्रसंगात त्याला मुख्यमंत्र्यांच्या मनाचा मोठेपणादेखील दिसला. हा प्रसंग प्रसादच्या घराच्या वास्तुशांतीदरम्यानचा आहे.

प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वीच मुंबईत स्वतःचं घर घेतलं. त्याने संपूर्ण हास्यजत्रेच्या टीमला आणि त्याच्या मित्रपरिवाराला या घराच्या वास्तुशांतीचं निमंत्रण दिलं होतं. या पूजेसाठी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बोलावलं होतं. प्रसादने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात त्याने ही भेट कशी घडली याबद्दल सांगितलं आहे. याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, 'मी घराच्या वास्तुशांतीसाठी उद्या मुख्यमंत्री येतील का असं त्यांच्या पीएला विचारलं. तर पीए म्हणाले हो नक्की येतील. वास्तूशांतीच्या दिवशी रात्री ९ वाजता ते रायगडमध्ये सभा घेत होते. माझा मुलगा लाईव्ह सभा बघत होता. तो म्हणाला आता काय ते येणं शक्य नाही. साडेनऊ वाजलेत रात्रीचे आता ते कसे येतील. १० वाजता सभा संपली आणि ११ वाजता ते माझ्या घरी टच झाले.'

प्रसाद पुढे म्हणाला, 'इतकंच नाही तर त्यांचा मोठेपणा काय आहे बघा. घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला विचारलं,'प्रसादजी किती लोकांचं जेवण आहे?' मी म्हटलं, 'म्हणजे?' तर ते म्हणाले, 'माझा स्टाफ १८ जणांचा आहे. मी म्हणलं साहेब २५-३० लोकांसाठी जेवण आहे.' मग ते म्हणाले 'हा मग ठीके'. त्यांनी स्वत:साठी नाही विचारलं तर त्यांच्याबरोबरचे ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, स्टाफ यांच्या जेवणासाठी माझ्याकडे चौकशी केली. याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस.'

'धर्मवीर २' येत्या २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

prasad oak
Bhool Bhulaiyya 3 & Singham Again : भुलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर भिडणार ? कार्तिकने रोहित शेट्टीला केला कॉल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.