स्नेहलने स्वयंपाक केला आणि १५ दिवस कुणीच... प्रवीण तरडेंनी सांगितला लग्नानंतरचा धमाल किस्सा, म्हणाले- आईने तिला

Pravin Tarde Snehal Tarde Love story: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या लग्नानंतरचा एक धमाल किस्सा सांगितला आहे जेव्हा जेवणामुळे सगळ्यांचे हाल झाले होते.
snehal tarde pravin tarde
snehal tarde pravin tarde esakal
Updated on

मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा 'मुळशी पॅटर्न' , 'देऊळबंद' या चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रवीण यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेदेखील आता दिग्दर्शनात उतरल्या आहेत. त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' या चित्रपटाचा दिग्दर्शन केलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ते त्यांच्या लग्नानंतरचा किस्सा सांगताना दिसत आहेत. स्नेहल जेव्हा लग्नानंतर त्यांच्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांच्या जेवणामुळे त्यांचे हाल झाले होते.

हा व्हिडिओ झी मराठी वाहिनीवरील 'ड्रामा ज्युनियर' या कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये प्रवीण म्हणतात, 'आमच्या लव्हस्टोरीमध्ये मी पाटील आणि स्नेहल टिपिकल पुणेकर. आमच्या आईची स्टाइल आहे जेवण बनवायची. आमच्याकडे चार वर्षाचं पोरगंपण तिखटच खातं. लग्नानंतर एक महिना ती हैराण झालेली. ती रडायची रोज जेवताना. आमच्याकडचं जेवण एकदम तिखट. मग ती बनवू लागली. शेवटी कसं आहे सुनबाई नवीन आहेत ना, त्यांना आपलं तिखट लागतं तर त्यांना बनवू दे. सुनबाईंनी बनवलं तिच्या स्टाइलने पुढचे १५ दिवस आमचं घर जेवत नव्हतं.'

पुढे स्नेहल म्हणाली, 'मी ना एकदा सासूबाईंना धीर करून सांगितलं बरं का की खूप तिखट होतेय भाजी, थोडं कमी तिखट करा. त्यांनी काय केलं असेल? भाजी तिखटच केली आणि वर मला साखर आणून दिली. आई म्हणाल्या असतील सवयी कुठे बदला.' त्यावर प्रवीण म्हणतात, आता मला तिच्या हातच्या भाजीची सवय झालीये.

snehal tarde pravin tarde
मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()