प्रिया बापट धडधडीत खोटं बोलली? मराठी दिग्दर्शकाने केली पोलखोल, म्हणाला- असं कसं बोलू शकता की...

Priya Bapat Statement Questioned By Marathi Director: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने मुलाखतीत आपल्याला चित्रपटाच्या ऑफर येत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर मराठी दिग्दर्शकाने नाराजी व्यक्त केली आहे.
priya bapat
priya bapat esakal
Updated on

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीसोबतच ती हिंदीमध्येही भरभरून काम करताना दिसतेय. ती सध्या अनेक हिंदी सीरिजमध्ये दिसतेय. मात्र गेली काही वर्ष प्रिया मराठीमध्ये दिसली नाही. त्याबद्दल विचारणा केली असता आपल्याला मराठी चित्रपटांसाठी विचारणाचं झालेली नाही असं ती म्हणाली होती. प्रियाने नुकताच सकाळ प्रीमिअरला मुलाखत दिली होती. यात बोलताना आपल्याकडे मराठी चित्रपटांच्या ऑफर येत नसल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र तिच्या या व्हिडिओवर एका मराठी दिग्दर्शकाने कमेंट करत ती खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाले दिग्दर्शक

मराठी दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी प्रियाच्या सकाळ प्रीमिअरवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपण तिला चित्रपटाची ऑफर दिली होती असं सांगितलं आहे. त्यांनी प्रियाचं म्हणणं खोडून काढत लिहिलं, 'दिली तर होती चांगल्या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाची ऑफर. पण काहीही न वाचता, न ऐकता नाही म्हणाली. मुलात यांना नुसता विषय ऐकून निर्णय घ्यायचा असतो. हिंदीत असं करत नाहीत. किमान नरेशन ऐकायला तरी बोलवतात. भले त्यांच्याकडे ५ - १० मिनिटं का असेनात. पण नरेट करायला सांगतात. मराठीत सुद्धा जर काही नवीन आणि वेगळं असं काही कथानक असेल तर किमान फिल्ममेकरकडून अर्ध्या तासाचं नरेशन तरी ऐका. तर ते ही नाही. असो.'

priya bapat
priya bapatesakal

त्यांनी पुढे लिहिलं, 'ऑफर आल्या होत्या पण मला त्या आवडल्या नाहीत असं तरी म्हणा बोला. ऑफर आल्याचं नाहीत असं कसं बोलू शकता?'असा थेट प्रश्न जालिंदर यांनी प्रियाला विचारला आहे. जालिंदर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'लंडन मिसळ, 'रेडीमिक्स' सारख्या चित्रपटांचं आणि 'का रे दुरावा', 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

priya bapat
'फुलवंती' गाजतेय पण चित्रपटासाठी हास्यजत्रेच्या कलाकारांनी किती घेतलंय मानधन? प्राजक्ता माळीने स्वतः सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.