त्याला कोणतीही पदवी मिळाली नाही पण... लक्ष्याच्या ७० व्या जन्मदिनाबद्दल प्रिया बेर्डेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाल्या?

Priya Berde Post On Lakshmikant Berde Birth Anniversary: प्रेक्षकांच्या लाडक्या लक्ष्याचा आज जन्मदिन. त्यानिमित्त अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
priya berde  on laxmikant berde
priya berde on laxmikant berde esakal
Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आणि सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत प्रेक्षकांसाठी त्यांचा लाडका लक्ष्या झाले. त्यांनी आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. जे लक्ष्याने केलं ते कुणीही करू शकत नाही हे, असा लक्ष्या पुन्हा होणे नाही ही वाक्य कायम चाहत्यांच्या तोंडी असतात. आज चाहत्यांच्या या लाडक्या हिरोचा जन्मदिन. आज जा लक्ष्या असता तर ७० वर्षांचा असता. आज त्याच्या जन्मदिनानिमित्त लक्ष्मीकांत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. गेल्या ७० वर्षात त्यांना कुणीही कोणतीही पदवी दिली नाही पण ते कायम सगळ्यांसाठी लक्ष्या राहिले असं त्यांनी लिहिलं आहे.

प्रिया यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर कठीण परिस्थितीत दिवस काढले. त्यांनी एकट्याने मुलांना वाढवलं. मनावर दगड ठेवून मुलांना लांब ठेवलं. लक्ष्मीकांत यांचं लवकर निधन झालं असलं तरी त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोगा मांडणारी एक पोस्ट प्रिया यांनी शेअर केली आहे. त्यांनी लक्ष्मीकांत यांचा फोटो शेअर करत लिहिलं, ' 70वर्ष.... आज जन्मदिवस. अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे, एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्या बद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात.. विनोद अनेक रूपाने समोर आला कधी दादा गिरीने तर कधी विनोदाचा सम्राट,तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळीत या कर्त्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला..आणि राहणार फक्त ... 'लक्ष्या''.

त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांना दुजोरा दिला आहे. आम्ही कितीही मोठे झालो कुठल्याही इंडस्ट्रीत काम करत असलो तरी आम्ही आमच्या "लक्ष्या" ला विसरणं शक्य नाही असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

priya berde  on laxmikant berde
ते येतायत! झी मराठीवर येतेय नवी मालिका, तुम्ही ओळखलंत का या जोडीला? नेटकऱ्यांनी सांगितलं मालिकेचं नाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.