Entertainment News: प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड सोबतच हॉलीवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली. सध्या ती तिची स्पाय सीरिज 'सीटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या शूटिंगला ती तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी हिला सोबत घेऊन गेली आहे. या शुटींगच्या निमित्ताने ही त्यांची एक फॅमिली ट्रिप झालीय असं म्हणायला हरकत नाही. या ट्रिपचे काही खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलेत. मात्र या सगळ्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मालती मेरीचा आवाज ज्यात मालती मेरी निकसोबत हिंदीमध्ये बोलतेय.
प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लंडनमधील दिवसांचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. एकीकडे तिने शुटिंगबद्दलचे काही फोटो शेअर केले आहेत तर दुसरीकडे तिने वैयक्तिक आयुष्यातील काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री तिचं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य अगदी सुंदर पद्धतीने संभाळतेय. अशात तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना १९ नंबरची स्लाइड आवडली आहे ज्यात प्रियांकाची लेक मालती मेरी तिच्या वडिलांशी बोलतेय. तेही हिंदीमध्ये. निक तिला हिंदीमध्ये आकडे शिकवतोय. त्यावर ती म्हणतेय हिंदीमध्ये... निक म्हणतो, हिंदीमध्ये काय? मालती मेरी पुन्हा म्हणते, हिंदीमध्ये... त्यावर निक म्हणतो, 'हिंदीमध्ये वन ला म्हणतात एक.' त्यांचं हे संभाषण ऐकायला खूप गोड वाटतंय.
या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं, 'हिचा आवाज किती गोड आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'मालती खूप क्युट आहे. खूप खूप प्रेम.' प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.