priydarshan jadhav
priydarshan jadhavesakal

नियम पाळून, टॅक्स भरून त्यांना काय मिळतं तर... प्रियदर्शन जाधवने मांडली मुंबईकरांची दुखरी बाजू

Priydarshan Jadhav Talked On Mumbai Problems: लोकप्रिय अभिनेता प्रियदर्शन जाधव याने मुंबईकांची व्यथा एका मुलाखतीत मांडली आहे.
Published on

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई आपलंसं करून घेते. प्रत्येक अडचणींवर मुंबईकर मोठ्या हिमतीने मात करताना दिसतात. कित्येकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येतात. मोठमोठी स्वप्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई आपलं मानते. मात्र दिवसेंदिवस मुंबईतली गर्दी वाढत चाललीये. ठिकठिकाणी इमारती उभ्या राहतायत. तर रेल्वे, बस यांवरील ताण वाढतोय. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यांमध्ये रस्ते हे समजत नाही. राजकारणी मात्र यापैकी कुठल्याही गोष्टीचा विचार करताना दिसत नाहीत. याच गोष्टीवर अभिनेता प्रियदर्शन जाधव याने भाष्य केलं आहे.

प्रियदर्शन याने काही दिवसांपूर्वी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रियदर्शन म्हणाला, 'खरे पणाने सांगायचं तर मनापासून वाटतं की मुंबईकडे लक्ष दिलं पाहिजे. ती देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वाधिक टॅक्स इथून भरला जातो. उत्तम पद्धतीनं नियम पाळणारे लोक आहेत. फार क्वचित असं दिसतं की हेल्मेट घातलेलं नाहीये. सीटबेल्ट लावलेला नाहीये. हजारो करोडो लोक ट्रेनने जातात. जर तुम्ही त्यामानाने अपघातांची संख्या पाहिली तर तो बराच कमी आहे. शिस्तबद्ध पद्धतीने सगळं आहे आणि त्या मानाने त्यांना अत्यंत थर्ड क्लास सोयी मिळतात.'

प्रियदर्शन पुढे म्हणाला, 'मुंबईच्या तू बाहेर पडलीस की लोक पोलिसांना दम देतात की नाही घालत हेल्मेट जा. काय करायचंय ते कर. तिथे काहीच कुणी कुणाला विचारत नाही. सगळं उत्तम चाललंय. मुंबईच्या माणसाने टॅक्स भरायचा. मुंबईच्या माणसाने नियम पाळायचे. मुंबईच्या माणसाने सगळं सहन करायचं. आणि सुखसोयी मात्र काहीच नाहीयेत. ते मिळायला हवं मुंबईला.' प्रियदर्शनच्या या विचारांना अनेकांनी दुजोरा दिला आहे. मुंबईला मुंबईचा विचार करणारा राजकारणी अजून मिळालेला नाही म्हणून ही अवस्था आहे असं अनेक नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

priydarshan jadhav
Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.