Tumbbad Box Office: 'तुंबाड'ने गाजवला वीकेंड! तीन दिवसात कमावले 'इतके' कोटी; करीनालाही टाकलं मागे

Tumbbad Box Office Collection Day 3: राही बर्वे यांच्या 'तुंबाड' ने बॉक्स ऑफिसवर स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. त्याने करीना कपूरच्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
tumbbad collection
tumbbad collection esakal
Updated on

सोहम शाहच्या 'तुंबाड'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. 2018 मध्ये, प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड'ने तेव्हा बॉक्स ऑफिसवर दोन महिन्यांत केवळ 13.48 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता सहा वर्षांनंतर पुन्हा रिलीज झाल्यावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शिक राही अनिल बर्वेचा हा हॉरर-थ्रिलर चित्रपट करीना कपूरच्या नवीन रिलीज झालेल्या 'द बकिंगहॅम मर्डर्स'पेक्षा चांगली कमाई करत आहे. खरं तर, 'तुम्बाड' ने री- रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये 'द बकिंगहॅम मर्डर्स' पेक्षा 40% अधिक कमाई केली आहे.

किती आहे तुंबाडची तीन दिवसांची कमाई

'तुंबाड'ने पुन्हा रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी देशभरात 1.60 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. दुसऱ्याच दिवशी त्याच्या कमाईत कमालीची वाढ झाली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता रविवारी तिसऱ्या दिवशी तीन कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. sacnilk च्या अहवालानुसार, 'तुंबाड' री- रिलीजने रविवारी देशभरात 3.25 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये एकूण 7.45 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. २०१८ मध्ये या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 3.25 कोटींची कमाई केली होती. आता हेच कलेक्शन तब्बल ७ कोटींच्या वर आहे.

करीनाच्या चित्रपटाची काय अवस्था?

दुसरीकडे, करीना कपूरच्या क्राइम-थ्रिलर 'द बकिंगहॅम मर्डर्स'ची अवस्था वाईट आहे. करीना या चित्रपटात मुख्य भूमिकेत तर आहेच, पण या चित्रपटातून ती निर्माती म्हणूनही पदार्पण करत आहे. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटातील करिनाच्या अभिनयाचे कौतुक झाले असले तरी कमाईच्या बाबतीत तो सपशेल अपयशी ठरला आहे. 'द बकिंगहॅम मर्डर्स'ने पहिल्या वीकेंडमध्ये केवळ 5.30 कोटींचा व्यवसाय केला आहे. जो पुन्हा रिलीज झालेल्या 'तुम्बाड' पेक्षा -40% कमी आहे.

tumbbad collection
तर तसा नवरा मला नको... लग्नाबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर; अपेक्षा सांगत म्हणाली, 'काही महिन्यानंतर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.