आता तू मला शिकवणार? शाल, गॉगल देणाऱ्या डिंपलचा राजेश खन्नांनी केलेला अपमान; घाबरलेल्या अभिनेत्रीने...

Dimple Kapadia On Rajesh Khanna Behaviour: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपण राजेश खन्ना यांच्यासोबत आनंदी नव्हतो असं सांगितलं आहे.
dimple kapadia
dimple kapadiaesakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'बॉबी' मधून बॉलिवूडला नवी बोल्ड हिरोईन मिळाली होती. मात्र पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डिंपलने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर तिने अभिनयाला रामराम ठोकला. १९७० मध्ये डिंपल लग्नबंधनात अडकली आणि जेव्हा तिला स्वतःची चूक कळली तेव्हा तिने पुन्हा अभिनयाची सुरुवात केली. डिंपलने कायमच राजेश यांना प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला मात्र राजेश यांच्यासोबतचा संसार हा तिच्यासाठी कायमच एक वाईट अनुभव ठरला. जुन्या दिलेल्या एका मुलाखतीत तिने एक किस्सा सांगितला होता जो ऐकून सगळेच चकीत झाले.

रेडीफला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत डिंपलने तिच्या विवाहित जीवनावर भाष्य केलं होतं. ते दोघे 'शिव शंकर' या चित्रपटासाठी एकत्र काम करत होते. तेव्हाचा एक किस्सा तिने या मुलाखतीत सांगितला होता. जेव्हा राजेश खन्ना त्यांच्या आयुष्यातलं अपयश अनुभवत होते तेव्हा त्यांचा राग हा असा निघत होता. ती म्हणाली, 'ती चित्रपट खूप चांगला बनला होता. पण आर्थिक अडचणीसुद्धा होत्या. आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा त्यांची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा ते बाल्कनीतून येऊन पत्रकारांसमोर हात हलवायचे. त्या दिवशी ते आले आणि बाल्कनीत उभे राहिले. मी त्यांना त्यांची शाल दिली. त्यांच्या खांद्यावर ठेवली आणि गॉगल दिला. त्यांना म्हणाले, काका , तुम्ही बाहेर जाता तेव्हा सरळ पाहू नका, तुमची साईड प्रोफाईल चांगली दिसते.'

डिंपल पुढे म्हणाली, 'हे ऐकताच त्यांनी माझ्याकडे रागात पाहिलं आणि म्हणाले, आता तू मला शिकवणार?' हे ऐकून मी खूप घाबरले. मी त्यांच्यासमोर हात जोडले आणि त्यांची माफी मागितली. जेव्हा व्यक्तीला अपयश येतं तेव्हा तो काहीच करू शकत नाही. त्याला हतबल व्हायला होतं. राजेश खन्नादेखील जेव्हा चित्रपटात काम करायचे तेव्हा ते बॉक्स ऑफिस रिपोर्टची वाट पाहायचे. पण चित्रपटाची कमाई इतकी खराब असायची की त्यांना आकडे सांगायची कुणाची हिंमत व्हायची नाही.'

dimple kapadia
शाळेत जाताना त्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट... सेलिना जेटलीने सांगितले धक्कादायक अनुभव; वाचून अंगावर येईल काटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.