ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच पश्चिम बंगाल येथील राणाघाट येथे जन्म झाला तो दिग्गज अभिनेत्री राखी यांचा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या राखी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं. मुख्य भूमिकांनंतर त्यांनी आईच्या भूमिकाही गाजवल्या. त्यांचं 'मेरे करण अर्जुन आयेंगे' हे वाक्य आजही अनेकांच्या तोंडी असतं. मात्र करिअरचा आलेख चढत असताना त्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक गोष्टींचा सामना करत होत्या. त्यांनी १६ वर्षांच्या असताना अजय विश्वास यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र अवघ्या २ वर्षात ते नातं तुटलं. त्यानंतर त्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी १९६७ साली बंगाली चित्रपट 'बोधु बोरॉन' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९७३साली गुलजार यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना मेघना नावाची मुलगीही झाली. मात्र मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यातील अंतर वाढत गेलं. याला कारण ठरला राखी यांचा एक निर्णय. लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही असं गुलजार यांचं म्हणणं असताना राखी यांनी पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. मात्र एका शूटिंग दरम्यान त्यांच्यात मारहाणदेखील झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मीरमध्ये 'आंधी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मुख्य अभिनेत्री सुचित्रा सेन अभिनेते संजीव कुमार यांच्यावर नाराज होत्या. गुलजार त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या हॉटेल रूममध्ये गेले. त्यांच्यात काही तास बोलणं झालं. त्यानंतर गुलजार त्यांच्या रूममधून बाहेर पडत होते मात्र तेव्हाच राखी यांनी गुलजार यांना पाहिलं. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रचंड मोठं भांडण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, तेव्हा गुलजार यांनी राखींवर हात उगारला होता. त्यानंतर त्या दोघांनी आपले मार्ग निवडले. दोघेही वेगळे झाले. मात्र कधीकधी ते दोघे एकत्र दिसतात. गेले ४४ वर्ष गुलजार एकटे राहत आहेत.
राखी यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'मेरे सजना', 'अंगारे', 'कभी कभी', 'दूसरा आदमी', 'कसमें वादे', 'काला पत्थर' आणि 'श्रीमान श्रीमती' सोबतच 'करण अर्जुन' सारखे हिट चित्रपट केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.