बहीण भावाच्या पवित्र नातं अतूट जोडून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येकासाठीच खुप खास असतो. आपल्या भावाबद्दलची आणि बहिणीबद्दलची माया दाखवणारा हा सण. कितीही भांडले तरी या दिवशी एकत्र येणारे म्हणजे भाऊ बहीण. उद्या १९ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरं केलं जाईल. मात्र बॉलिवूडमध्ये आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतात. पाहूया अशाच काही अभिनेत्रींच्या जोड्या.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे या दोघी दरवर्षी एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतात.
अभिनेत्री तितिक्षा आणि खुशबू यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकली आहेतच. या दोघी बहिणी प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. त्या दोघीही एकमेकींना राखी बांधतात आणि राखीपौर्णिमा साजरी करतात.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू तिची बहीण शगुन पन्नू हिला दरवर्षी राखी बांधते. तापसी एक अभिनेत्री आहे तिची बहीण शगुन पन्नू ही २००६ मधील मिस इंडियाची फायनॅलिस्ट आहे. शगुन सध्या एक इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवते
करिष्मा आणि करीना या दोन बहिणींमध्ये मैत्रीचं नातं आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या दोन बहिणीसुद्धा एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन साजरं करतात.
दीपिका आणि अनिशा या दोघी बहिणी त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी या दोन बहिणी एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करतात.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आणि निशा अग्रवाल या दोन बहिणी सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतात. काजल आणि निशा सुद्धा दरवर्षी एकमेकींना राखी बांधतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.