मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २०२३ मध्ये निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी होती. पण रमेश देव यांचं निधन झालं आणि अल्झायमर या आजारामुळे २४ ऑगस्टला सीमा देव यांनीही अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव, दोन सुना, नातवंडं आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर त्यांची धाकटी सून स्मिता देव यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.
स्मिता यांनी नुकतीच कांचन अधिकारी यांच्या युट्यूबला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या सासूबाईंबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'त्या खूप तरुण वयापासून काम करत होत्या. नाटकाचे दौरे, चित्रपटाचं शूट करायच्या. एका चित्रपटासाठी त्यांनी एक महिना सलग काम केलं आणि जेव्हा त्या चित्रपटाच्या प्रीमियरला गेल्या तेव्हा त्यांना समजलं की त्या फक्त एका लॉन्ग शॉट मध्ये आहेत. त्या म्हणाल्या, मी एवढं जीव ओतून काम केल्यानंतर जर एवढंच असणार असेल. तर मी काम करणार नाही. त्यामुळे त्यांनी काम करणं सोडून दिलं. त्याखूप प्रेमळ होत्या.'
स्मिता पुढे म्हणाल्या, 'अभिनय क्षेत्रातील काम सोडल्यानंतर अजिंक्यला मुलगा झाला आणि मग त्या त्याच्याबरोबर वेळ घालवू लागल्या. मग मी आले. त्यानंतर आईना शॉपिंगला, भाजी आणायला घेऊ जायला लागले. आमच्या दोघींचं स्वयंपाक, शॉपिंगमध्ये करताना फार एकमत असायचं. त्यांना स्वयंपाक बनवायची खूप आवड होती. त्या अजिंक्य आणि अभिनयचा बर्थडे केक स्वतः घरी करायच्या.”
स्मिता यांनी सांगितलं की, 'त्यांना जेवण करण्याची खूप हौस होती. ते परफेक्ट गृहिणी म्हणतात ना तशा होत्या त्या. सगळे नाटकाचे दौरे, आणि चित्रपटाचं शूटिंग करून त्या घर सांभाळायच्या. त्यांना शिक्षिका व्हायचं होतं” स्मिता आणि सीमा यांचं नातं खूप छान होतं. स्मिता आजारी असताना सीमा त्यांची काळजी घ्यायच्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.