रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Ranbir Kapoor Alia Bhatt Lavish House In Bandra Is Ready : रणबीर आणि आलियाचा बांद्रा येथील आलिशान बंगला आता बांधून तयार झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
alia bhatt ranbir kapoor
alia bhatt ranbir kapooresakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. आलिया आणि रणबीर यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांचं लग्नही घरच्याघरीच पार पडलं होतं. मात्र लग्नापूर्वीच त्यांनी बांद्रा येथे एक जागा खरेदी केली होती. जिथे त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर बनवण्याचा निर्णय घेतला होता. करोना काळापासून हे घर बनवण्याचं काम सुरू होतं. आता अखेर त्यांचं हे घर बनून तयार झालं आहे. त्यांच्या नव्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी मात्र निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

लेकीच्या नावावर आहे नोंदणी

दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथे बनत असलेल्या या आलिशान बंगल्याची किंमत 250 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. आणि अभिनेता रणबीरने त्याची मुलगी राहाच्या नावावर या घराची नोंदणी केली आहे. सध्या ही इमारत तयार असून ती एखाद्या महालापेक्षा कमी नाही. अत्यंत लॅव्हिश अशी दिसणारी ही इमारत अगदी छोट्या अँटिलीयाप्रमाणे दिसत आहे. एका बिल्डिंगप्रमाणे या घराचं इंटेरिअर करण्यात आलं आहे. लग्न झाल्यापासून रणबीर आणि आलिया हे घर तयार करण्यात व्यग्र होते. आणि आता ते शेवटी पूर्ण झालं आहे. त्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या गाहर्ट रणबीर आणि आलिया नेमकं कधी राहायला येणार याबद्दल अजून कोणतीही माहिती नाही. मात्र हे घर नेटकऱ्यांना फारसं आवडलेलं दिसत नाही.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

हे घर पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'काय मूर्खपणा आहे, आमच्या दिल्लीतील पॉश एरियातील बंगले बघा, मग तुम्हाला बंगला म्हणजे काय ते कळेल.' एकजण म्हणाला, 'हे एल्विश यादवच्या घरासारखं दिसलं.' एकजण म्हणाला, 'व्वा, काय सुंदर बंगला आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'हे अजिबात लॅव्हिश नाही, ते पूर्णपणे सामान्य दिसतंय.' दुसऱ्याने लिहिलं, 'गरीबांची अँटिलिया.' एकाने लिहिले, 'हॉस्पिटल सारखं दिसत आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'बाहेरूनही थोडं चांगलं इंटेरिअर केलं असतं तर बरं झालं असतं.' आता रणबीर आणि आलिया त्यांच्या घरात कधी राहायला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

alia bhatt ranbir kapoor
Bhool Bhulaiyaa 3 Cast Fees: विद्यापेक्षा महागडा ठरला कार्तिक तर तृप्तीला सगळ्यात कमी फी, माधुरी दीक्षितचं मानधन किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.