लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्याने 'ये जवानी हें दिवानी' ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' मधून आपल्या अभिनयाची खरी ताकद दाखवून दिली. त्याच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रचंड चर्चा झाली. मात्र जी भूमिका तो या चित्रपटात जगला तीच भूमिका तो खऱ्या आयुष्यातही जगला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आणि वडील ऋषी कपूर यांच्यामधील नातं कसं होतं हे सांगितलं आहे.
ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखले गेले. ते पत्रकारांवर ओरडतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर अनेकदा ऋषी आणि रणबीर एकाच ठिकाणी एकत्र आले असतानाही ऋषी त्याला आपल्या मुलासारखं कधीही वागवताना दिसले नाही. याबद्दल अनेकदा प्रेक्षकांमध्येही चर्चा झाली आहे. अशातच आता स्वतः रणबीरने मुलाखतीत त्याच्या आणि वडिलांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. रणबीरने नुकतीच ‘पीपल विद डब्ल्यूटीएफ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, 'मी माझ्या वडिलांसोबत इतका फ्रेंडली नव्हतो. आमच्यात मैत्रीचं वातावरण नव्हतं.'
रणबीर पुढे म्हणतो, 'ते रागीट होते पण एक चांगले व्यक्ती होते. मी कधीही त्यांच्या डोळयांचा रंग पाहू शकलो नाही कारण मी नेहमी त्याच्यासमोर असा मान खाली घालून उभा राहायचो किंवा बसायचो. ते नेहमी कुठे ना कुठे प्रवास करत असायचे त्यामुळे आमच्यात मैत्रीचं नातं कधी बनलं नाही. मी त्यांचा खूप आदर करतो. पण आपल्या वडिलांसोबत असतं तसं नातं माझं कधीही बनलं नाही. मी 'अॅनिमल' चित्रपट खूप रिलेट करू शकतो. मी समजू शकतो की त्या चित्रपटात मी जी भूमिका केली त्या मुलाला काय वाटत असेल. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे.' अॅनिमल चित्रपटातही एक मुलगा आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी व्याकुळ होताना दिसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.