बिझनेस टायकून रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांना काही काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहितीनुसा, ते वयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते. आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या पहिल्या आणि शेवटच्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. मात्र प्रत्येक व्यवसायात उच्च दर्जाची प्रगती साधणाऱ्या रतन टाटा यांना त्यात यश मिळालं नाही. रतन टाटा यांनाही चित्रपटांमध्ये रस होता हे फार कमी लोकांना माहिती आहे. ही घटना 2004 साली घडली होती. जेव्हा ते चित्रपटांकडे वळले आणि पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. पण आपले पैसे बुडतील याची त्यांना कल्पना नव्हती. हा चित्रपट टाटा इन्फोमीडियाच्या बॅनरखाली बिझनेस टायकून रतन टाटा यांनी बनवला होता.
विक्रम भट्ट यांनी या रोमँटिक सायकोलॉजिकल चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. हा चित्रपट आहे 'ऐतबार'. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. रतन टाटा यांनी बनवलेला हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या 'फिअर' या अमेरिकन चित्रपटापासून प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा एका बापाची होती जो आपल्या मुलीला तिच्या वेड्या प्रियकरापासून वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतो.
या चित्रपटात बिपाशा बसूने मुलीची तर बिग बींनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर सायकिक लव्हरची भूमिका जॉन अब्राहमने केली होती. रतन टाटा यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण जेव्हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटाची अवस्था इतकी वाईट होती की सर्वांनाच धक्का बसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने भारतात 4.25 कोटी रुपये कमवले, तर जगभरात 7.96 कोटी रुपये कमावले. म्हणजेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. त्याचे बजेट अंदाजे 9.50 कोटी रुपये होते. या चित्रपटाची वाईट अवस्था पाहून रतन टाटा यांनी पुन्हा चित्रपट व्यवसायात काहीही पैसे गुंतवले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.