मी कुणालाही माफ केलेलं नाही! तुरुंगातील घाणेरड्या दिवसांबद्दल बोलली रिया चक्रवर्ती; म्हणाली- तिथे फक्त

Rhea Chakraborty talked About What She Faces In Jail: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या तुरुंगातील दिवसांबद्दल भाष्य केलं आहे.
rhea Chakraborty
rhea Chakrabortyesakal
Updated on

१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील बांद्रा येथील घरात गळफास लावून घेतला आणि सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. त्याच्या मृत्यूच्या संशयाखाली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आणि सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. सुशांतच्या मृत्यूच्या आरोपाखाली तिला तुरुंगातही टाकण्यात आलं. मात्र तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न मिळाल्याने तिची सुटका करण्यात आली. मात्र या घटनेने रिया आतून बाहेरून हादरली. आपल्यावर असा काही आरोप होईल हे आपल्या ध्यानीमनीही नव्हतं असं ती नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे. या मुलाखतीत तिने तिचा जेलमधील प्रवासही सांगितला आहे.

रियाने नुकतीच ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना रिया म्हणाली, 'रात्रभर, दिवसभर सोशल मीडियावरचं ट्रोलिंग, मीडिया ट्रायल्स यासगळ्यचा सामना मी केला. तेही तेव्हा जेव्हां मी माझा सगळ्यात जवळचा व्यक्ती गमावला होता. मला आठवतंय मी सतत स्वतःला आरशात पाहून एकच गोष्ट सांगायचे. वाकू नको, झुकू नको, तुला यांच्या या गोळ्यांचा सामना करावाच लागेल. तुला हे करावंच लागेल. तू घाबरलीयेस का? हो. मला खरंच भीती वाटायची दररोज माझ्या बिल्डिंगखाली दिसणारी मीडिया आणि इथून चौकशीसाठी जायचीसुद्धा भीती वाटायची कारण मध्येच रस्त्यात काय घडेल याची शाश्वती नव्हती.'

कसे होते जेलमधले दिवस?

रिया पुढे म्हणाली, 'जेव्हा मी जेलमधून बाहेर आले तेव्हा मला ठाऊक होतं की आता मी जुनी रिया नाहीये. आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही. तुरुंग हे एक वेगळं जग आहे कारण तिथे कोणताही समाज नाहीये. तिथे फक्त जगायचं असतं. सगळं फक्त सांगण्याशी संबंधित असतं. तिथे प्रत्येक दिवशी जिवंत राहण्यासाठीची लढाई असते. उद्याचा दिवस कसा उगवेल हे सांगता येत नाही. आणि तिथला प्रत्येक दिवस हा एका वर्षासारखा असतो. तिथे कुणीही तुमचे मित्र नसतात. तिथे तुम्ही फक्त एक नंबर असता. आणि जिवंत राहणं हे एकमेव ध्येय असतं. बाहेरही सगळेच तुमचे मित्र नसतात, या सगळ्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब विखुरलं गेलं. मी त्यातल्या सगळ्यांना माफ केलेलं नाहीये. काही लोक तर माझ्या डोक्यात गेलेत.'

rhea Chakraborty
Jahnavi Killekar: पैसा पाहून भुलली असं... दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.