Rhea Chakraborty: ही काळी जादू करते... सुशांतच्या मृत्यूच्या ४ वर्षानंतर रिया चक्रवर्तीने दिलं उत्तर; सांगितलं आता कशी करते कमाई

Rhea Chakraborty Income Source: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिला पोलिसांनी अटक केली होती. मात्र पुरावे न मिळाल्याने तिची सुटका करण्यात आली.
rhea chakraborty
rhea chakraborty sakal
Updated on

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिच्या आयुष्यात अशा काही घटना पाहिल्या ज्यांचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर तिला चाहत्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. तर त्याच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. ड्रग प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती त्यांत २०२० मध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर ती आपलं आयुष्य पूर्वीसारखं जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सुशांतच्या मृत्यूनंतर बदललेल्या आपल्या आयुष्यावर भाष्य केलं आहे.

सुष्मिता सेनसोबत केलेल्या एका पॉडकास्टमध्ये रिया म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यात एक असा काळ पाहिला जेव्हा मी खूप काही सहन केलं. सगळे त्याबद्दल माहीत असल्याचं सांगतात पण त्यांना खरं तर काहीच माहीत नाहीये. माझ्यासाठी हे त्या घटना विसरून पुन्हा उभं राहणं एका पुनर्जन्मासारखं आहे. आता हे आयुष्य मी त्यांच्यासोबत जगणार आहे जे माझ्या कठीण काळात माझ्यासोबत होते.'

त्यानंतर ती म्हणाली, 'अनेकांना असा प्रश्न आहे की मी माझा खर्च कसा करते, काय काम करते. कारण मी आता चित्रपटात दिसत नाही. मी मोटिव्हेशनल स्पिकिंग करून पैसे कमावते. मी लोकांना चांगलं आयुष्य जगायला प्रेरणा देते. आपल्या दुःखातून अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी मदत करते. मानसिक आधार देते. लोकांना माझा नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाचा राग होता. कारण माझी तशी छबी बनवण्यात आली होती.'

ती पुढे म्हणाली, 'लोक म्हणायचे की माझ्याकडे जिम, एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी जाण्याची महाशक्ती आहे. लोकांनी तर मला चेटकीण असल्याचं म्हटलं. मी काळी जादू करते असं बोललं गेलं. कोण काय बोलतं याने मला फरक पडत नाही. कोण तुमचा राग करतं कोण तुमच्यावर प्रेम करतं याने मला आता काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतः किती मजबूत राहता यावर सगळं अवलंबून असतं.' रियाची ही मुलाखत सध्या व्हायरल होतेय.

rhea chakraborty
Ranbir Kapoor: ते खूप जास्त रागीट... घरी मुलाशी असे वागायचे ऋषी कपूर; रणबीर म्हणाला- मी कधीच त्यांचे डोळे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.