'क्योकी' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिमी सेन गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीमधून गायब आहे. तिने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या रिमी नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. तिने एका महागड्या गाडीच्या कंपनीवर तब्बल ५० कोटींच्या भरपाईचा दावा ठोकला आहे. आपण खरेदी केलेली कार ही अतिशय वाईट असून तिच्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय असं म्हणत तिने कंपनीवर मानसिक त्रास दिल्याच आरोप केला आहे.
रिमी सेनने जग्वार लँड रोव्हर ही महागडी गाडी डीलर सतीश मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 92 लाख रुपयांना खरेदी केली होती. ही गाडी जानेवारी २०२३ पर्यंतच्या वॉरंटीसह आली होती. मात्र COVID-19 महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे कार क्वचितच वापरली गेली. रिमी सेनचा आरोप आहे की, जेव्हा तिने नियमितपणे कार चालवायला सुरुवात केली तेव्हा तिला सनरूफ, साउंड सिस्टीम आणि रियर-एंड कॅमेरा संबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
कारमधील याच समस्यांमुळे 25 ऑगस्ट 2022 रोजी एक मोठी घटना घडली. मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील बिघाडामुळे कार एका खांबावर आदळली. डीलरशिपला या समस्यांबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु रिमी सेनचा दावा आहे की तिच्या तक्रारींचे पूर्णपणे निराकरण झाले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पुरावे मागवण्यात आले. त्यामुळे पुन्हा पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू राहीलं. एक समस्या दूर होताच दुसरी तयार होती.
तिच्या कायदेशीर नोटीसमध्ये, रिमी सेनने असा युक्तिवाद केला आहे की कारमध्ये मूलभूत दोष आहेत, मग ती निर्मिती असो किंवा अधिकृत डीलरने केलेली देखभाल असो. ती म्हणाली की गाडी दुरुस्तीसाठी दहापेक्षा जास्त वेळा पाठवली आहे, तरीही त्या अडचणी तशाच राहिल्याने तिला मानसिक त्रास व गैरसोय होत आहे. यामुळे रिमीने तिने सहन केलेल्या या अडचणी आणि मानसिक त्रासामुळे कंपनीवर ५० कोटींच्या भरपाईचा दावा केला आहे. सोबतच आपल्या न्यायालयीन खर्चासाठी १० लाख रुपयांची मागणीही केली आहे. तर सध्याची डिफेक्टिव्ह कर बदलून देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.