Rinku Rajguru On Family: मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे 'सैराट'. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला दोन नवे कलाकार दिले. रिंकूने याच चित्रपटातून घराघरात ओळख निर्माण केली. त्यानंतर ती 'झिम्मा २' मध्येही झळकली. रिंकूने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिने चित्रपटसृष्टीला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. तर तिचा चाहतावर्गही प्रचंड आहे. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र रिंकू आजवर कधीही तिच्या आजोळी गेलेली नाही. त्यामागे एक मोठं कारण आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.
रिंकूने नुकतीच 'व्हायफळ' या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिला ती सुट्ट्यांमध्ये कुठे जाते याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'मी आजोळी कधी गेले नाही, कारण आई खूप लहान असतानाच पहिल्यांदा तिचे वडील वारले, मग आई वारली. तिची गोष्टच वेगळी आहे. मग ती लग्न करून इकडे आली आणि मग लग्नानंतरच तिने शिक्षण घेतलं. आईला स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. ती म्हणाली, मला स्वत:चं असं काहीतरी पाहिजे. बाबा म्हणाले, शिक्षण घे. मग तिने डी.एड. केलं आणि आज तीदेखील शिक्षिका आहे.'
त्यानंतर तिने तिच्या इतर नातेवाईकांबद्दलही सांगितलं. ती म्हणाली की, आम्हाला रक्ताची नाती कमी आहेत. आईचा माहेरशी काही संबंध नाही. त्यामुळे कधी आजोळी जाणं झालं नाही. मला आठवतंय, सुट्ट्यांमध्ये मी एकदा की दोनदा आत्याकडे गेले होते. पण, तिचं घर छोटं होतं आणि तिथेच तिचं किराणा मालाचं दुकान होतं आणि आम्ही लहान होतो, त्यामुळे तिला सगळं सांभाळणं व्हायचं नाही.' यामुळे रिंकू कधीही आजोळी गेलेली नाही. या मुलाखतीत तिने तिच्या आणि आईच्या चहाच्या आवडीबद्दल सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.