Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा शनिदर्शनात ‘शॉर्टकट’; चौथऱ्याखालूनच हात जोडले

Rinku Rajguru At Shani Shingnapur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने शनी मंदिरात चौथ्याखालूनच हात जोडत दर्शनाचा शॉर्टकट मारलाय.
Rinku Rajguru
Rinku Rajguru At Shani Shingnapurrasakal
Updated on

Entertainment News: 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या साधेपणावर चाहते फिदा आहेत. रिंकू सोशल मीडियावरही सक्रीय असते. ती चाहत्यांसोबत जोडलेली असते. रिंकू शेवटची 'झिम्मा २' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता प्रेक्षक तिच्या पुढील प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. मात्र अशातच रिंकू एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. रिंकू नुकतीच शनी शिंगणेश्वर येथे दर्शनासाठी गेली होती. मात्र तिथल्या गर्दीमुळे तिला आटोपतं दर्शन घ्यावं लागलं. रिंकूने चौथऱ्याखालूनच देवाला हात जोडत गर्दीतून मार्ग काढला.

नेमकं काय घडलं

रिंकू राजगुरू तोंडाला मास्क लावून शनिमंदिरात आली खरी; मात्र दर्शनाच्या वेळेस तिने मास्क काढून अभिषेक, तेल अर्पण व दर्शन करणार तोच उपस्थित भाविकांना तिची ओळख पटली आणि छायाचित्र घेण्यासाठी एकच गर्दी केली. चाहत्यांचा गराडा, आरडाओरड आणि गोंधळ सुरू होताच तिने चौथऱ्याखालूनच हात जोडत काढता पाय घेतला. जाताना तिच्या वाहनाला मोठा गराडा झाल्याने पोलिस बंदोबस्तात तिच्या वाहनाची वाट मोकळी करून देण्यात आली.

शनिशिंगणापूर येथे सध्या दीपावली सुटीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बरोबर सुरक्षारक्षक नसल्याने रिंकूने आपले वाहन गावकरी प्रवेशद्वाराच्या वाहनतळात लावून मास्क लावले व तोंडावर व अंगावर मोठी शाल पांघरून मंदिरात पायी चालत आली. निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व डिझाईन असलेली निळ्याच रंगाची शाल तिच्या अंगावर होती. तिच्या बरोबर स्वीय सहायक व एक महिला मदतनीस होती. देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात कर्मचारी बापूसाहेब दरंदले यांनी रिंकूचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. घाई गडबडीत दर्शन व्यवस्थित झाले नसून, पुन्हा कधीतरी नक्की येईल, असे तिने सांगितले.

Rinku Rajguru
कलर्स वाल्यांचं नेमकं काय सुरू आहे? दोन नव्या मालिका होणार बंद; नेटकऱ्यांनी चॅनेलला सुनावलं, म्हणाले- आम्ही इथे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.