ऋषी कपूर यांच्या अचानक निधनाने अशी झालेली कपूर कुटुंबाची अवस्था; लेक रिद्धिमा म्हणाली- तोंडावर दाखवत नसले तरी...

Riddima Kapoor Talked About Rishi Kapoor Death लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. रिद्धिमाने तेव्हाची परिस्थिती सांगितली आहे.
riddhima kapoor
riddhima kapoor esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. सोबतच त्यांच्या दिसण्यावर लाखो मुली फिदा होत्या. मात्र ३० एप्रिल २०२० रोजी त्यांचं निधन झालं. ते कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेहून उपचार घेऊन आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली होती. मात्र अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर कपूर कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हिने तेव्हा त्यांच्या घरात नेमकी काय परिस्थिती होती हे सांगितलं आहे. तेव्हा घरात सगळे दुःखी होते मात्र कुणीही तसं काही दाखवत नव्हतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या खोलीत जाऊन रडत होता असं ती म्हणाली आहे.

रिद्धिमाने नुकतीच नेटफ्लिक्सचा शो फॅब्युलस लाइफ्स विरुद्ध बॉलिवूड वाइफ्स या कार्यक्रमात दिसली. त्यानंतर तिने सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना रिद्धिमा म्हणाली, 'जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. तेव्व्ह आम्ही खूप दुःखी होतो पण आम्ही कुणीही एकमेकांना आपल्या भावना दाखवल्या नाहीत. आम्ही समोरच्याला मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांसमोर रडतही नव्हतो. आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जायचो आणि रडायचो. बाहेर येऊन सगळ्यांसमोर एरवी बोलतो तसे बोलायचो. या घटनेमुळे आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो. कुटुंबातल्या कुणीही एकमेकांसोबत त्यांचं दुःख शेअर केलं नसलं तरी आम्ही सगळे आतून दुःखी होतो. त्यानंतर म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आमच्या आईने आमची आधीपेक्षाही जास्त काळजी घेतली.'

ऋषी कपूर रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. न्यूयॉर्कमध्ये दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यानंतर 2019 मध्ये ते भारतात परतले. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

riddhima kapoor
लग्नासाठी कशी मुलगी हवीये? साध्याभोळ्या सुरजची आहे एकच अपेक्षा, म्हणाला- लय मुलींचे मेसेज येतात पण मला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.