Bigg Boss Marathi ५ Bhaucha Dhakka: सध्या कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी ५' प्रचंड गाजतोय. सुरुवातीपासूनच सगळ्यांच्या नजरा बिग बॉसच्या घरात खिळल्या होत्या. आता तर घरातल्या सदस्यांचा खेळ पाहून प्रेक्षक पुढील भागासाठी आणखीनच उत्सुक झाले आहेत. गेले दोन आठवडे गाजवल्यानंतर आता पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. या आठवड्यात रितेशच्या निशाण्यावर वैभव चव्हाण आहे. 'आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका', असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेश वैभव चव्हाणची चांगलीच हजेरी घेताना दिसणार आहे.
कलर्स मराठीतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात रितेश वैभवाची शाळा घेताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये रितेश वैभवला म्हणतो,'बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात?' त्यावर घरातील सदस्य उत्तर देताना फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असं म्हणतात. या घरात गद्दार कोण आहे असं विचारल्यावर अरबाज वैभवचं नाव घेतो. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कमध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली. त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे. रितेश वैभवला म्हणतो, 'तू जर असं म्हणाला असतास की तुम्ही मला तुमच्या ग्रुपमधला समजू नका तर चाललं असतं. पण हे बोलायला जिगर लागते.'
रितेश वैभवला म्हणतो,"ती जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय, गद्दार म्हणून बाहेर पडू नका". असं म्हणत आज रितेश त्याला सुनावताना दिसतोय. आता वैभवसोबत आणखी कुणाकुणाच्या नंबर लागणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.