सुख कळले! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने केला हक्काच्या घरात गृहप्रवेश; शेअर केला वास्तुशांतीचा व्हिडिओ

Rohit Mane New House: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने नुकताच हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
rohit mane
rohit mane sakal
Updated on

स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ते घर छोटंसं का असेना. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. साई ताम्हणकर ते शिवाली परब अशा अनेक कलाकारांनी मुंबईत स्वतःचं घर घेतलं. या घरात थाटामाटात गृहप्रवेश केला. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. हा अभिनेता आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित माने. रोहितने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत नवं घर घेतलं होतं. आता त्याने त्याच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे. त्याने त्याचा एक सुंदर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. हाताला काम दिलं आज तेच कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर गगनाला गवसणी घालताना दिसत आहेत. वनिता खरात, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर अशा अनेक कलाकारांना या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच कार्यक्रमातील का म्हणजे रोहित माने. रोहितने काही महिन्यांपूर्वी मुंबईत घर घेत गुड न्यूज दिली होती. त्याने चाहत्यांना घराच्या किल्ल्या दाखवत आनंदाची बातमी शेअर केली होती. आता त्याने या घरात गृहप्रवेश केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी आणि तो वास्तुशांत करताना दिसत आहेत तर आजूबाजूला त्याचे कुटुंबीयदेखील दिसत आहेत.

आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत तो आपल्या पत्नीसह ही पूजा करत आहे. त्यांनी पारंपरिक लूक केला आहे तर छोटीशी चूल बनवून त्यावरून दूध ओतू घालवताना ते दिसत आहेत. हाताचे ठसे उमटवताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडिओमधून बाल्कनीतून दिसणारा सुंदर निसर्गदेखील त्यांनी चाहत्यांना दाखवला आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे. नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर सिनेसृष्टीतील मित्रमंडळीही त्यांचं अभिनंदन करत आहेत. प्रियदर्शिनी इंदलकर, सौरभ चौघुले, वनिता खरात, प्रथमेश परब यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत रोहितचं कौतुक केलं आहे.

rohit mane
Stree 2 Teaser : ओ स्त्री रक्षा करना ! श्रद्धा राजकुमारच्या बहुप्रतीक्षित स्त्री 2 चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.