तिने करून दाखवलंच! पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट, रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर; थाटामाटात केली वास्तुशांत

Rupali Bhosale: लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने मुंबईत तिच्या हक्काचं घर घेतलं आहे.
rupali bhosale new house
rupali bhosale new house sakal

Rupali Bhosale New Home: स्वतःचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. छोटंसं का असेना पण आपलं असं एक घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. हीच इच्छा उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसले हिची इच्छा आता पूर्ण झाली आहे. रुपालीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांनी त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं त्यात आता रुपालीच्या नावाचाही समावेश झाला आहे. अभिनेत्रीने स्वबळावर आपल्या आईवडिलांसाठी स्वतःचं घर घेतलं आहे. मोठ्या थाटामाटात तिने या घराची वास्तुशांतकेली आहे.

rupali bhosale new house
rupali bhosale new house sakal

रुपालीने अनेक अडचणींचा सामना केला आहे. वडिलांच्या झालेल्या फसवणुकीमुळे तिच्या कुटुंबावर पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची वेळ आली होती. भावाच्या अपघातातदेखील तिनेच आपल्या कुटुंबाला आधार दिला. आता तिच्या कष्टाचं चीज झालं असं म्हणता येईल. कित्येक वर्षाच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आहे. तिने अखेर मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. गेले वर्षभर ती या घराच्या इंटेरिअरवर काम करत होती. तिचं घर अत्यंत सुंदर असून तिने घराचा प्रत्येक कोपरा स्वतःच्या स्टाइलने सजवला आहे. वास्तुशांतीला तिने तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं. या प्रसंगी ती प्रचंड भावुक झाली होती.

rupali bhosale new house
rupali bhosale new house sakal
rupali bhosale new house
rupali bhosale new house sakal

रुपालीने घराच्या वास्तुशांतीसाठी खास लूक केला होता. तिने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसली होती. आणि हिर्या आणि मोत्याचे दागिने परिधान केले होते. या वास्तुशांतीसाठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता सुशांत शेलार याने हजेरी लावली होती. आता तिच्या घराचे इनसाइड फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

rupali bhosale new house
बिअरच्या एका घोटाचं लोकांनी चर्वण केलं... गरोदरपणातील वक्तव्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अदिती सारंगधरने सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com