छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रुशद राणा हा प्रेक्षकांचा लाडका आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. केवळ मालिकाच नाही तर त्याने चित्रपटातही उत्तम काम केलं आहे. त्याने शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळ्या बड्या कलाकारांसोबत काम केलंय. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचा अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. या अभिनेत्रींनी आपल्याला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं असं रुशद म्हणाला आहे.
रुशदने ऐश्वर्यासोबत 'मोहोब्बत्ते' मध्ये काम केलं होतं. तर प्रीतीसोबत तो 'वीर झारा' मध्ये दिसला होता. रुशदने नुकतीच सिद्धार्थ कनन याला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने सांगितलं की त्या दोघीही त्याच्याकडे कशा पाहायच्या. रुशद म्हणाला, 'मोहोब्बत्ते' च्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या आली आणि मला न पाहिल्यासारखं करून गेली. तिने माझ्या आरपार पाहिल्यासारखं केलं. हीच गोष्ट प्रीती झिंटा हिच्यासोबत घडली. प्रितीने 'वीरझारा' दरम्यानसुद्धा हेच केलं. कुणीही अशा लोकांना हाय नाही बोलू शकत जे समोरच्याला पाहून न पाहिल्यासारखं करतात.'
तो पुढे म्हणाल, 'पण राणी मुखर्जीचं वागणं याच्या अगदी विरुद्ध आहे. राणीने सांगितलं की तिची आई रुशदचा कार्यक्रम 'कहता है दिल' ची खूप मोठी चाहती होती. ती दररोज हा कार्यक्रम पाहायची. राणीने आणि तिच्या आईने माझ्या कामाचं कौतुकही केलं होतं.' कामाबद्दल सांगायचं तर रुशदने अमिताभ बच्चन यांच्या सोबत 'बागबान' चित्रपटात त्यांच्या मुलाचं काम केलं आहे. रुशद यापूर्वी जान्हवी कपूरच्या उलझन या चित्रपटात दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.