सचिन पिळगावकर यांनी श्रियाला 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये का नाही घेतलं? म्हणाले- स्वप्नील जोशीमुळे...

Sachin Pilgaonkar On Navra Maza Navsacha 2 : लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये श्रियाला का नाही घेतलं याचं कारण सांगितलं आहे
navara maza navsacha 2
navara maza navsacha 2 esakal
Updated on

Navara Maza Navsacha 2 Release Date: 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट तब्बल १९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' ची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. 'नवरा माझा नवसाचा'च्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. आता १९ वर्षानंतर २० सप्टेंबर रोजी 'नवरा माझा नवसाचा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात एक वेगळी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. मात्र घरातच इतकी चांगली कलाकार असताना तिला 'नवरा माझा नवसाचा' मध्ये मुख्य भूमिका का दिली नाही असा प्रश्नही अनेक प्रेक्षकांना पडला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी यावर उत्तर दिलं आहे.

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकरही अतिशय उत्तम अभिनेत्री आहे.तिने बॉलिवूडमध्ये मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, मग घरात इतकी छान अभिनेत्री असताना तिला आपल्या सिनेमात जागा का नाहीये असा प्रश्न त्यांना माझा कट्टावर विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सचिन म्हणाले, ' मला या सिनेमात स्वप्नील जोशीला घ्यायचं होतं. तो या सिनेमात माझ्या जावयाची भूमिका करतोय. तोही मला माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे श्रिया आणि त्याचं नातं हे बहिण भावासारखं आहे. म्हणून ते एकमेकांच्या अपोझिट भूमिकेत काम नाही करु शकत. त्यामुळे मी श्रियाला घेतलं नाही.'

पुढे ते म्हणाले, 'तसंच जेव्हा या सिनेमाचं काम सुरु झालं, त्यावेळी तिच्याकडे खूप काम होतं, तिला वेळच नव्हता. म्हणून श्रियाला या सिनेमात घेतलं नाही. तिचा वेळ हे देखील एक कारण होतं तिला सिनेमात न घेण्याचं.' या सिनेमात सुप्रिया पिळगांवकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अभिनेत्री हेमल इंगळे ही या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

navara maza navsacha 2
असं करण्याची काहीही गरज... आस्तादच्या 'कलावंत' ढोलताशा पथक सोडण्यावर सौरभ गोखलेने सोडलं मौन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.